Lokmat Sakhi >Social Viral > लग्नात वऱ्हाडी असे दणक्यात नाचू लागले, की जमीनच खचली..वऱ्हाड जोरात आपटलं आणि..

लग्नात वऱ्हाडी असे दणक्यात नाचू लागले, की जमीनच खचली..वऱ्हाड जोरात आपटलं आणि..

Dance Floor Collapse at Wedding Party : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लोक म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 04:05 PM2022-06-29T16:05:56+5:302022-06-29T16:41:01+5:30

Dance Floor Collapse at Wedding Party : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लोक म्हणाले...

Dance Floor Collapse at Wedding Party : At the wedding, the bride and groom started dancing in such a way that the ground was destroyed..the bridegroom hit hard and .. | लग्नात वऱ्हाडी असे दणक्यात नाचू लागले, की जमीनच खचली..वऱ्हाड जोरात आपटलं आणि..

लग्नात वऱ्हाडी असे दणक्यात नाचू लागले, की जमीनच खचली..वऱ्हाड जोरात आपटलं आणि..

Highlightsलोक या व्हिडिओला विशेषत: कॅमेरामनच्या कौशल्याला बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत. इतकी मोठी घटना नेमकी कुठे घडली, यामध्ये किती जण जखमी झाले याबाबची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

घरात किंवा मित्रमंडळींमध्ये कोणाचे लग्न म्हणजे धुमधडाका आणि मज्जा. खाणे-पिणे, छान छान कपडे घालून मेकअप करुन मिरवणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे डान्स. लग्नाच्या वरातीत मनसोक्त डान्स करणे हा तर अनेकांसाठी एक सोहळाच असतो. हा डान्स करताना आपण पूर्ण भान हरपून नाचत असतो. अशावेळी अचानक आपण उभे असलेली जमीन अचानक खचली तर? वाचूनही काहीसे घाबरायला होईल अशी घटना नुकतीच घडली आहे. इतकेच नाही तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्याबाबत बरीच चर्चा होताना दिसत आहे. लग्नसोहळ्यात अनेकदा काही ना काही कारणाने अपघात घडतात. मात्र हा अपघात जास्तच धडकी भरवणारा होता असे म्हटले जात आहे (Dance Floor Collapse at Wedding Party).

(Image : Google)
(Image : Google)

या व्हिडिओमध्ये लग्नाच्या वातावरणामुळे सगळे आनंदात आहेत आणि नाचत आहेत. पण नाचताना एकाएकी कार्यालयाचा पूर्ण मजलाच खाली पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे या मजल्यावर जितके लोक नाचत होते तेही एकाएकी खाली पडले आणि जमिनीच्या आतल्या बाजूला पडल्याचे दिसतात. विशेष म्हणजे हे सगळे होत असताना लग्नाचे फोटो काढणारा आणि व्हिडिओ शूटींग करणारा कॅमेरामन मात्र आपल्या हातातील कॅमेरा घेऊन या अपघाताचेही क्षण आपल्या कॅमेरात टिपताना दिसतो. बाजूला एका खुर्चीवर बसलेला हा कॅमेरामन आपल्या कॅमेरात संमारंभाचे सगळे क्षण नेमकेपणाने टिपत असल्याने त्याचे खऱ्या अर्थाने कौतुक आहे. 

त्या कॅमेरामनला पाहून सोशल मीडियावर लोकांनी या व्हिडिओला एकाहून एक कमेंटस दिल्याचे दिसते. एक यूजर या व्हिडिओवर कमेंट देताना म्हणतो, कॅमेरामन आपले कर्तव्य विसरलेला नाही. तर काही जण म्हणतात, कॅमेरामन हा कायम कॅमेरामनच असतो. अशाप्रकारे लोक या व्हिडिओला विशेषत: कॅमेरामनच्या कौशल्याला बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत. आता इतकी मोठी घटना नेमकी कुठे घडली, यामध्ये किती जण जखमी झाले याबाबची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

Web Title: Dance Floor Collapse at Wedding Party : At the wedding, the bride and groom started dancing in such a way that the ground was destroyed..the bridegroom hit hard and ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.