वय हा फक्त एक आकडा आहे. हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल याचंच उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वयस्कर आजोबा जबरदस्त ठेका धरताना दिसत आहेत. हे ७० वर्षीय आजोबा आपल्या पत्नीचा राग घालवण्यासाठी फिल्म द बीस्ट च्या अरबी कुथू गाण्यावर पूर्ण एनर्जीसह थिरकताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही चेहऱ्यावर सुंदर हास्य खुलेल. (Dance video viral wholesome video of elderly man dancing for his wife on arabic kuthu goes viral)
या व्हिडिओनं लक्ष वेधून घेतलं आहे. एक वयस्कर महिला खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिच्या आजूबाजूला आजोबा मस्तीत डान्स करत आहेत. आपल्या पत्नीला खूष ठेवण्यासाठी काहीही करण्याची या आजोबांची तयारी आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांचा दिवस आनंदात जात आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर optimistic_chatterbox नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'जर तुम्ही तुमच्या आतल्या लहान मुलाला जिवंत ठेवले तर तुमच्या आजूबाजूला नेहमी आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या विनंतीवरून मी हे अपलोड केले आहे.
७० च्या दशकातील माझी अम्मा आणि अप्पा.' व्हायरल झालेल्या या व्हिडिओने काही सेकंदातच खळबळ उडवून दिली. या व्हिडिओला आतापर्यंत 7.7 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर व्हिडिओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज आले आहेत.