Join us  

लाईव्ह परफॉर्मन्सवेळी स्टेजवर अचानक कुत्रा आला, अन् डान्सरनं असं काही केलं, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 1:19 PM

Dancer dancing with stray dog viral video of dog : लाईव्ह स्टेज परफॉर्मेंन्स दरम्यान कुत्रा आला यानंतर डान्सरनं जे  काही केलं ते पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.

कुत्रे, मांजरी हे पाळीव प्राणी अनेकांना स्वत:पेक्षाही जास्त आवडतात पण एखाद्या महत्वाच्या ठिकाणी कुत्रा  आल्यानंतर काय होईल याचा विचारही केला जाऊ शकत नाही. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाईव्ह स्टेज परफॉर्मेंन्स दरम्यान कुत्रा आला यानंतर डान्सरनं जे  काही केलं ते पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल. (Dancer dancing with stray dog viral video of dog interrupts performance on stage dancer dances with stray dog)

डान्सर स्टेजवर डान्स करत होती. त्याच दरम्यान एक  कुत्रा तिथे पोहोचतो आणि डान्सरला मिठी मारून नाचू लागतो. या घटनेनं डान्स करणाऱ्या महिलेचा आत्मविश्वास जराही डगमगत नाही ती अगदी न घाबरता त्याच्यासोबत नाचू लागते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या डान्सरचा परफॉर्मन्ससुद्धा पाहण्यासारखा आहे. 

प्रेग्नंट असल्याचं माहीत नव्हतं; अचानक पोट दुखायला लागलं, विमानाच्या टॉयलेटमध्ये बाळाला दिला जन्म..

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा आहे, ज्यामध्ये पारंपारिक नृत्य करण्यासाठी जात असलेल्या महिलेसोबत कुत्राही स्टेजवर पोहोचतो. हा व्हिडीओ कुठला  आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण एक भटका कुत्रा तिच्या जवळ येतो तेव्हा एक महिला स्टेजवर नाचत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या महिलेला त्याच्या येण्याने अजिबात त्रास होत नाही आणि त्याला सोबत घेऊन तिचे नृत्य करत राहते. त्याचा आत्मविश्वास पाहून प्रेक्षक थक्क होतात.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया