Lokmat Sakhi >Social Viral > ५ मैत्रिणींनी केली आपापल्या नवऱ्याची तुफान फजिती; बिचारे इतके लाजले की..-व्हिडिओ पहा हसतच रहाल..

५ मैत्रिणींनी केली आपापल्या नवऱ्याची तुफान फजिती; बिचारे इतके लाजले की..-व्हिडिओ पहा हसतच रहाल..

Viral Funny Video: नवऱ्यावर कधी प्रँक (pranks on husband) करण्याची इच्छा झाली आणि त्यासाठी काही आयडिया पाहिजे असेल, तर या सगळ्या मैत्रिणींनी मिळून काय केलं ते एकदा बघाच.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 06:30 PM2022-07-28T18:30:46+5:302022-07-28T18:31:42+5:30

Viral Funny Video: नवऱ्यावर कधी प्रँक (pranks on husband) करण्याची इच्छा झाली आणि त्यासाठी काही आयडिया पाहिजे असेल, तर या सगळ्या मैत्रिणींनी मिळून काय केलं ते एकदा बघाच.. 

Danger funny prank on husbands, Women secretly buy same shirts for their husbands and then..... | ५ मैत्रिणींनी केली आपापल्या नवऱ्याची तुफान फजिती; बिचारे इतके लाजले की..-व्हिडिओ पहा हसतच रहाल..

५ मैत्रिणींनी केली आपापल्या नवऱ्याची तुफान फजिती; बिचारे इतके लाजले की..-व्हिडिओ पहा हसतच रहाल..

Highlightsहा एक मजेदार व्हिडिओ तुम्ही बघायलाच हवा.. यात ५ मैत्रिणींनी मिळून आपापल्या नवऱ्याची अशी मजा घेतली आहे तो व्हिडिओ (viral video) पाहून हसूच येतं..

इंटरनेट एकदा सूरु केलं की अवघ्या एका क्लिकवर आपल्याला जी पाहिजे ती माहिती मिळू शकते. अगदी स्वयंपाक घरातल्या साध्या- सोप्या किचन हॅक्सपासून (kitchen hacks) ते जागतिक राजकारणापर्यंत काहीही आपण तिथे शोधू शकतो. आता जर तुम्हाला तुमच्या नवऱ्याची (husband) थोडी फजिती करण्याची किंवा त्याच्यावर एखादा प्रँक (pranks) करण्याची इच्छा झाली असेल, तर हा एक मजेदार व्हिडिओ तुम्ही बघायलाच हवा.. यात ५ मैत्रिणींनी मिळून आपापल्या नवऱ्याची अशी मजा घेतली आहे तो व्हिडिओ (viral video) पाहून हसूच येतं..

 

साधारणपणे आपण जेव्हा कुठे बाहेर जायला छान तयार होतो, तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की आपलं ड्रेसिंग अगदी परफेक्ट असावं. इतर सगळ्यांपेक्षा आपला ड्रेस वेगळा आणि छान असावा. अशावेळी जर आपण छान तयार होऊन बाहेर पडलो आणि आपल्याला आपल्या सारखेच कपडे घातलेली एखादी व्यक्ती दिसली तर मात्र सगळा मूडच जातो. त्यांचे आणि आपले सारखे सारखे कपडे पाहून खूपच वेगळं वाटतं.. असेच जर एकदम इतर ४ जणं अगदी तुमच्यासारखेच कपडे घालून आले तर काय होईल... असंच काहीसं झालं आहे या ५ मित्रांसोबत..

 

@eliistender10 या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं दिसतंय की ५ मैत्रिणींनी आपापल्या नवऱ्याची चांगलीच मजा घ्यायची ठरवली आहे. त्या पाचही जणींनी सोबत खरेदी केली आणि आपापल्या नवऱ्यासाठी अगदी सारखे शर्ट घेतले. सगळ्यांना एकाचवेळी ते शर्ट कसे घालायला लावायचे, याचं छान प्लॅनिंगही केलं. त्यानुसार त्यांनी हॉटेलमध्ये भेटायचं ठरवलं आणि त्यावेळी प्रत्येकीने आपापल्या नवऱ्याला तोच सारखा शर्ट घालायला लावला. बायकोने प्रेमाने दिलेलं गिफ्ट म्हणून नवऱ्यांनीही ते शर्ट आनंदाने घातले.

तूम गंदी हो... मै चला जाऊंगा दुनिया से! असं लहान मुलगा आईला सुनावतो, कारण काय तर..

पण जसे ते हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी मित्रांना त्यांच्या सारख्याच शर्टमध्ये पाहिलं, तेव्हा मात्र सगळेच लाजले होते. एकसारखे कपडे घालून आलेल्या त्या पाचही जणांकडे हाॅटेलमध्ये इतर लोकंही मोठ्या गमतीने बघत होते. शेवटी त्यापैकी एका नवऱ्याला हे सगळं इतकं असह्य झालं की त्याने बिचाऱ्याने टेबलाखाली स्वत:ला लपवून घेतलं. हा मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. 

 

Web Title: Danger funny prank on husbands, Women secretly buy same shirts for their husbands and then.....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.