Join us  

डेअरिंगबाज आई! न्यूझीलंडच्या खासदारबाई मध्यरात्री प्रसूतीवेदना सुरू होताच स्वतः सायकल चालवत पोहचल्या दवाखान्यात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 12:28 PM

ऐकावे ते नवलच, प्रसूतीवेदनेत सायकलवर हॉस्पिटलला जाणाऱ्या महिलेच्या धाडसावर नेटीझन्सनी केला कौतुकाचा वर्षाव

ठळक मुद्दे२ ते ३ मिनिटांच्या अंतरानी प्रसूतीकळा येत असताना या महिलेचे डेअरिंग कौतकास्पदकोणतीही मदत न घेता स्वत:च्या बळावर पोहोचली हॉस्पिटलमध्ये

प्रसूतीकळा ही काय गोष्ट असते हे जी बाई त्यातून जाते तिलाच माहित. या अवस्थेत एखादी बाई धड उभीही राहू शकणार नाही. पण न्यूझीलंडमधील एका धाडसी महिलेने एक कमालच केली. प्रसूतीवेदना सुरू झाल्यावर तिने कोणाचीही मदत न घेता थेट स्वत:ची सायकल काढली आणि ती चालवत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. ज्यूली अॅन जेंटर असे या महिलेचे नाव असून ती न्यूझीलंड ग्रीन येथील खासदार आहे. तिच्या या धाडसी कृत्याने तिने नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे ही तिची दुसरी प्रसूती होती, तर पहिल्या प्रसूचीच्या वेळेसही ती अशाचप्रकारे सायकलवर हॉस्पिलटलला पोहोचली होती. सायकलवर हॉस्पिटलला सुखरुप पोहोचल्यानंतर रविवारी पहाटे ३ च्या दरम्यान तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. लेबर रुममध्ये प्रसूतीकळा देत असताना तिने आपण सायकलवर याठिकाणी आल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगितले. तसेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही ही गोष्ट शेअर केली. यामध्ये तिचे सायकलवरील आणि हॉस्पिटलमधील काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. 

जेंटर आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणते, “अशाप्रकारे सायकलवर हॉस्पिटलला जायचे प्लॅनिंग नव्हते, पण ते तसे घडले. रात्री २ वाजता जेव्हा मी घर सोडले तेव्हा माझ्या प्रसूती वेदना तितक्या तीव्र नव्हत्या, दर दोन ते तीन मिनिटांनी कळा येत होत्या. मात्र आम्ही १० मिनिटांत हॉस्पिटलला पोहोचलो त्यानंतर या कळा तीव्रतेने वाढल्या. आता आम्ही एका छानशा हेल्दी आणि आनंदी असलेल्या बाळाला जन्म दिला आहे, जे आता त्याच्या बाबांसारखए झोपले आहे. हॉस्पिटलच्या सगळ्या टिमने अतिशय उत्तमरितीने सगळी प्रक्रिया पार पाडल्याने त्यांचे मनापासून आभार”. 

तिन फेसबुकवर शेअर केलेल्या या पोस्टवर शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. इतकेच नाही तर तिच्या या डेअरिंगमुळे तिचे नोटीझन्सकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे. तर काहींनी गर्भधारणेच्या काळात सायकलिंग करणे फायदेशीर ठरत असल्याचेही म्हटले आहे. तीन वर्षापूर्वी ऑकलंड येथील हॉस्पिटलमध्येही जेंटर अशाच पद्धतीने सायकलवर गेली होती आणि मुलाला जन्म दिला होता. 

टॅग्स :सोशल व्हायरलन्यूझीलंडप्रेग्नंसीगर्भवती महिला