आपल्या मुलांना यशाचं शिखर गाठताना पाहण्याची इच्छा प्रत्येक आई वडिलांची असते. आई वडीलांकडून गिफ्ट मिळाल्यानंतर आनंदी झालेल्या एका तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या क्लिपमध्ये या तरूणीचा तिचे आई वडील आयफोन १२ गिफ्ट करत आहे. हे गिफ्ट मिळाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. (Daughter gets iPhone 12 as surprise gift from parents after cracking neet exam reaction will melt your heart see video)
व्हिडिओ आरजे मेहेननं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुरूवातीला या मुलीचे आई वडील मुलीला गिफ्ट देण्यासाठी तिच्या खोलीत जातात आणि पुढचा व्हिडिओ सुरू होतो. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की मुलगी १२ वी बोर्डाच्या परिक्षेत पहिली आली आणि तिनं NEET ची परिक्षाही उत्तीर्ण झाली.
मागच्या १८ वर्षांपासून तिनं तिच्या आईवडीलांकडून काहीच मागितलं नव्हतं. म्हणूनच तिनं मिळवलेल्या यशाबद्दल भेटवस्तू देण्यासाठी आई वडीलांनी दिला आयफोन भेट दिला. अनेकवर्षांपासून ती तिचा जूना फोन वापरत होती. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की. “आम्ही आमच्या मुलीला तिच्या 18 व्या वाढदिवशी आश्चर्यचकित करण्याचे ठरवले. त्याने आमच्याकडून कधीच काही मागितले नाही. जेव्हा आम्ही तिला विचारतो की तुला काय हवे आहे आणि ती म्हणते, 'माझ्याकडे खूप आहे', 'माझ्याकडे सर्व काही आहे'.