रोज मेसचं जेवण खाणारे लोक घरच्या जेवणाची किती आठवण काढतात. हे तुम्ही कधीतरी आपल्या मित्र मैत्रिणींकडून ऐकलंच असेल. किंवा तुम्ही स्वत: कधी हॉस्टेलमध्ये राहिला असाल तर तुम्ही तुम्हाला घरच्या जेवणाची किंमत नक्कीच कळली असणार. सोशल मीडियावर घरच्या जेवणासंदर्भातील एका काकूंचं पत्र व्हायरल होत आहे. (Daughters friend hate hostel food her mother start sending home food everyday)
या विद्यार्थीच्या मैत्रिणीची आई तिला रोज घरचं जेवण पाठवू लागली, याआधी ती मेसचं जेवण खात होती. ट्विटर युजर श्रुबरी म्हणाली की, 'मैत्रिणीकडे मी मेस फूडची तक्रार केली होती आणि तिनं तिच्या आईला सांगितले, त्यामुळे तिची आई मला जवळजवळ दररोज जेवण पाठवत आहे.
जेव्हा तिनं तिच्या मैत्रिणीला सांगितलं की, 'मी तुझ्या आईनं दिलेला डबा घेऊ शकत नाही. कारण मला नंतर रिकामा डबा परत करावा लागेल याशिवाय त्या डब्यात भरून देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. त्यावेळी मैत्रिणीच्या आईनं पत्र पाठवले आणि त्या पत्रात जे लिहिले ते पाहून तुम्हाला मानवतेचे दर्शन होईल.
काकूंनी पत्रात लिहिले, 'जेवणाचा आस्वाद घ्या. मुलांनी आईला रिकामा टिफिन पाठवण्याची काळजी करू नये. तुम्ही तुमचे प्रेम आणि आपुलकी टिफिन सोबत पाठवू शकता ते पुरेसे आहे .आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. या ट्विटने लोकांची मने जिंकली.
लग्नानंतर रोज साडीच नेसावी लागणार; नवरीकडून त्यानं कॉन्ट्रॅक्टवर सहीच घेतली आणि..
एका यूजरने लिहिले की, 'माझी आई माझ्या हॉस्टेलच्या दिवसात माझ्या सर्व मित्रांना जेवण पाठवायची. मित्रांप्रमाणेच ज्युनियर सिनियर्स सगळे खायचे. ही पोस्ट वाचून सोशल मीडियावर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.