किचनमधील काही पदार्थ असे असतात जे उग्र वासाचे असतात. असे पदार्थ दीर्घकाळ डब्यांत ठेवले की त्या पदार्थाचा वास त्या डब्याला किंवा बरणीला लागतो. अशी बरणी किंवा डबा उघडला की त्यातून त्याच पदार्थाचा वास (Brilliant hacks to remove food smells from jar) कायम येत राहतो. काहीवेळा या बरणीमधील तो उग्र वासाचा पदार्थ वापरुन संपतो तरीही त्या बरणीला त्याच पदार्थाचा वास येत राहतो. अशावेळी आपण ही बरणी अनेकदा घासून, पुसून स्वच्छ करतो, असे केले तरीही काहीवेळ या पदार्थांचा वास तसाच येत राहतो(How to Get Rid of Pickle Odor).
लोणचं, मुरांबा, मसाले, चपातीचा डबा, खडे मसाले, (How do you get the spice smell out of jars?) फोडणीचा डबा असे अनेक उग्र वासाचे पदार्थ आपल्या किचनमध्ये असतात. तसेच या प्रत्येक पदार्थाचे डबे हे ठरलेले असतात. आपण असे काही खास पदार्थ हे नेहमी त्याच डब्यांत ठेवतो. काहीवेळा हे डबे रिकामी झाले की आपण ते इतर पदार्थ ठेवण्यासाठी वापरतो. परंतु अशा डब्यांमध्ये इतर पदार्थ जरी ठेवले तरीही त्यातील जुन्या पदार्थाचा वास (simple hack for removing odor from stinky jars) काही केल्या जात नाही, अशा परिस्थितीत जर आपण त्यात दुसरा पदार्थ ठेवला तर तो त्या वासाने देखील खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी काही सोप्या घरगुती ट्रिक्सचा वापर करुन आपण या काचेच्या बरण्या किंवा स्टीलच्या डब्यांतील पदार्थांचा उग्र वास चुटकीसरशी काढू शकतो(How do you get the smell of pickles out of a pickle jar?).
डब्यांतून येणारा पदार्थाचा उग्र वास काढून टाकण्याच्या सोप्या २ ट्रिक्स...
ट्रिक - १
१. सर्वप्रथम आपण ज्या डब्यांत हा उग्र वासाचा पदार्थ ठेवला आहे, तो डबा लिक्विड सोपच्या मदतीने स्वच्छ धुवून घ्यावा.
२. डबा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तो आतून कापडाने पुसून कोरडा करून घ्यावा.
३. स्वच्छ कोरडा करुन घेतलेल्या या डब्यांत किंवा बरणीत एकाच वेळी ३ ते ४ माचिसच्या काड्या पेटवून टाकाव्यात आणि डब्याचे किंवा बरणीचे झाकण लावून बंद करून घ्यावे.
४. हे झाकण २ ते ३ मिनिटांसाठी गच्च लावून घ्यावे.
५. त्यानंतर डब्याचे किंवा बरणीचे झाकण उघडून लिक्विड सोप व पाण्याने डबा, बरणी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यावे.
कुकरची शिटी स्वच्छ कशी करायची ? काचेच्या बाटलीवरचे स्टिकर कसे काढायचे ? घ्या एकदम सोपे झटपट उपाय...
किचनमधली वेळखाऊ कामे होतील सोपी, ३ ट्रिक्स - कामे आटोपतील भरभर, टेंशन कमी...
ट्रिक - २
१. सर्वप्रथम आपण ज्या डब्यांत हा उग्र वासाचा पदार्थ ठेवला आहे, तो डबा लिक्विड सोपच्या मदतीने स्वच्छ धुवून घ्यावा.
२. त्यानंतर डबा, बरणी कापडाने स्वच्छ पुसून घ्यावे.
३. आता या बरणीत किंवा डब्यांत कागदाचा किंवा वर्तमानपत्राचा बोळा भरुन झाकण लावून घ्यावे.
४. त्यानंतर किमान एक आठवडा ही बरणी व डबा असाच बंद करुन ठेवावा.
५. एक आठवड्यानंतर हा कागदाचा बोळा काढून टाकून बरणी, डबा स्वच्छ धुवून घ्यावा.