Join us  

दिव्या भारतीला मुळीच आवडत नव्हता अभ्यास!! म्हणूनच तर तिने..... ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2022 5:46 PM

Death Anniversary of Divya Bharati: अभिनेत्री दिव्या भारती म्हणजे बॉलीवूडचं एक सुखस्वप्न... ती आली तशीच झटकन निघूनही गेली.. पण आजही तिच्या अनेक आठवणी तिच्या चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत...

ठळक मुद्देतिच्या जाण्याने तिच्या बाबतच्या अनेक गोष्टी अनुत्तरीत राहिल्या खऱ्या; पण आजही तिच्या चाहत्यांना तिच्याबाबत जाणून घेण्याची प्रचंड ओढ असते..

अवघी तीन- साडेतीन वर्षांची तिची अभिनेत्री म्हणून असणारी कारकिर्द. पण एवढ्या कमी कालावधीतही तिने जे काही चित्रपट केले, त्यातून रसिकांच्या मनावर स्वत:चा एक भक्कम ठसा उमटवला. म्हणूनच तर आज तिचा मृत्यू होऊन थोडी- थोडकी नाही तर तब्बल २९ वर्षे उलटून गेली असली तरी दिव्या भारतीचं ( Divya Bharati) नाव अजूनही अनेकांच्या ओठांवर आहे. तिच्या आठवणी तिच्या चाहत्यांनी अगदी जशाच्या तशा जपल्या आहेत. 

 

५ एप्रिल १९९३ रोजी (5th April 1993) अवघ्या १९ वर्षी दिव्या भारतीने या जगाचा निरोप घेतला. तिच्या जाण्याने तिच्या बाबतच्या अनेक गोष्टी अनुत्तरीत राहिल्या खऱ्या; पण आजही तिच्या चाहत्यांना तिच्याबाबत जाणून घेण्याची प्रचंड ओढ असते.. तिचे चित्रपट ज्यांनी पाहिलेले नाहीत, अशा नव्या पिढीलाही तिच्याबाबत खूप उत्सूकता आहे.. म्हणूनच मृत्यूनंतर काही वर्षांनी दिव्या भारतीच्या पालकांची बॉलीवूड हंगामा यांच्यातर्फे विशेष मुलाखत घेण्यात आली होती. यामध्ये दिव्याच्या आई मिता (Meeta Bharati)आणि वडील ओमप्रकाश (Om Prakash Bharati) यांनी तिच्याबाबतचे अनेक किस्से तिच्या चाहत्यांना सांगितले. 

 

तेव्हा दिव्याच्या आईने सांगितले की दिव्याला अभ्यासाचा खूप कंटाळा होता.. तिला अभ्यास करायला अजिबातच आवडायचे नाही. अभ्यासात ती एकदमच झीरो होती असं म्हटलं तरी वावगं होणार नाही.. तिने एकदा मला सहजच विचारलं की आई मी जर चित्रपटांमधून कामं करू लागले तर काय होईल...त्यावर मी तिला म्हणाले की तुला तुझा अभ्यास थांबवावा लागेल.. तिला हेच तर अपेक्षित होतं.. माझं उत्तर ऐकून तिचे डोळे चमकले आणि तिने तात्काळ सांगून टाकलं की मला आता अभ्यास करायचा नाही.. तु याबाबत लगेच वडिलांशी लगेचच बोल अशी जबाबदारी माझ्यावर टाकून ती मोकळीही झाली.. 

 

यानंतरचा तिचा प्रवास तर सगळ्यांना माहितीच आहे.. अभ्यासातला झिरो तिने अशा पद्धतीने मिटवून टाकला आणि स्वत:च्या आयुष्यात ती खऱ्या अर्थाने हिरो झाली...  

टॅग्स :सोशल व्हायरलबॉलिवूडसेलिब्रिटीदिव्या भारतीमृत्यू