दिवाळीनंतर येणारा सर्वात मोठा सण म्हणजे तुलशीविवाह. तुलशीविवाहाला आता अवघे काहीच दिवस बाकी राहिले आहेत. तुळशीला माता लक्ष्मी समजून तिचे पूजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे कार्तिक शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी तुळशीविवाह सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. तुळशीविवाह या खास प्रसंगी आपल्या घरातील लहानशा कुंडीतील तुळशीच्या रोपाची सजावट केली जाते. या खास प्रसंगी, तुळशी वृंदावन किंवा तुळशीची कुंडी गेरू व चुन्याने रंगरंगोटी करुन त्यावर आकर्षक डिझाइन्स काढून सजवली जाते. त्यानंतर तुळशीच्या कुंडीत आवळा, चिंच, बोरं असे पदार्थ ठेवतात(Tulsi Dress Poshak for Tulsi Plant Pot On Tulsi Vivah).
तुळशीचे लग्न अगदी थाटामाटात लावले जाते. या खास प्रसंगी तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात. वस्त्र म्हणून तुळशीच्या रोपट्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचे कापड गुंडाळले जाते. परंतु बदलत्या काळानुसार, आता बाजारात चक्क तुळशीसाठी खास असा पोषाख देखील विकत मिळतो. हा पोषाख आपण अगदी सहजपणे तुळशीच्या रोपाला घालू शकतो. यामुळे तुळस अधिकच सुंदर आणि आकर्षक दिसते(Decorate Your Tulsi Plant Pot With Various Colours Tulsi Dress Poshak).
तुळशीविवाहसाठी पोषाख...
तुळशी विवाहाला तुळशीच्या कुंडीभोवती फक्त लाल रंगाचे वस्त्र गुंडाळण्याची कल्पना आता फार जुनी झाली. आता तुळशीविवाहासाठी बाजारांत वेगवेगळ्या डिझाइन्सचे पोषाख अगदी सहज विकत मिळतात.
या तुळशीविवाह निमित्त खास पोषाख सेटमध्ये तुळशीच्या कुंडीला घालता येईल असा घागरा आणि दुपट्टा असतो. वेगवेगळ्या, रंगीबेरंगी प्रिंटेड डिझाइन्स त्यावर आकर्षक डिझाइन्सच्या बारीक लेस लावून हा घागरा सजवला जातो. तुळशीच्या रोपट्याचा कुंडीभोवती आपण अगदी सहजपणे हा घागरा गुंडाळून तुळशीला घालू शकतो. एखाद्या बटव्याला ज्याप्रमाणे दोरी असते, त्याचप्रमाणे या घागऱ्याला देखील दोरी असते. हा रेडिमेड घागरा तुळशीच्या रोपाच्या कुंडीभोवती गुंडाळून मग त्याची दोरी खेचून ओढली की हा घागरा आवळून कुंडीभोवती अगदी फिट बसतो.
साडीची घडी ‘अशी’ झाला झटपट, पाहा भन्नाट ट्रिक! कपाटही दिसेल आवरलेलं- साड्या राहतील नव्याकोऱ्या...
अशाच प्रकारे आपण या सेटमधील दुपट्टा देखील तुळशीच्या रोपाला घालू शकतो. तुळशीच्या रोपाच्या कुंडीभोवती घागरा बांधून रोपावर हा दुपट्टा अंथरुन आपण आपल्या तुळशीला एखाद्या नवरी प्रमाणे नटवू शकतो. अशाप्रकारे आपण रेडिमेड पोषाख विकत घेऊन तुळशी विवाहाला तुमच्या तुळशीला सुंदर आणि आकर्षक लूक देऊ शकतो.
तुळशी विवाहासाठी हा पोषाख तुम्हाला बाजारांत अगदी सहज विकत मिळेल. याचबरोबर आपण ऑनलाईन देखील हा पोषाख ऑर्डर करु शकतो. ऑनलाईन ऑर्डर करुन आपल्याला हा रेडिमेड पोषाख एका क्लिकवर घरपोच मिळेल. तुळशीसाठी हा पोषाख विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/3CarEWM