Join us  

दीपिका पादूकोण सांगते इवल्याशा बाळाला सांभाळताना नव्या आईची तारांबळ, सतत धाकधूक काही चुकलं तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2024 3:06 PM

Deepika Padukone As A New Mom: लहान बाळाला सांभाळताना नव्या आईला किती प्रश्न पडतात, सांगतेय लेकीच्या संगोपनात रमलेली दीपिका पादूकोण

ठळक मुद्देनव्या आईला सगळ्यात जास्त अलर्ट ठेवणारी गोष्ट म्हणजे बाळाचं फिडिंग, नंतर त्याला उभं धरणं, ढेकर काढणं, शी- शू बघणं आणि झोपवणं, झोप झाली की पुन्हा फिडिंग आणि मग पुन्हा तेच तेच..

'जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे...' असं आपल्याकडे म्हणतात ते काही उगाच नाही. दुरून सगळं छान- छान, मस्त- मस्त दिसत असलं तरी ते तसं असतंच असं नाही. आता नुकतीच बाळंतीण झालेली एखादी स्त्री तिच्या बाळाकडे डोळेभरून पाहण्यात रमलेली दिसली की तो क्षण प्रत्येकाला लोभसवाणाच वाटतो. पण प्रत्यक्षात आईपण काय असतं हे त्याचा अनुभव घेतलेली एखादी स्त्रीच समजू शकते. बाळाच्या जन्माने आई सुखावून जाते, हे अगदी खरं. पण ते जेवढं वाटतं किंवा चित्रपटांत, गोष्टींमध्ये जेवढं सुखावह असल्याचं आपण पाहतो, तेवढं ते प्रत्यक्षात नसतं, हा अनुभव आई झालेली प्रत्येक स्त्री घेतच असते. तसाच अनुभव सध्या अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone As A New Mom) घेत आहे.

 

आपल्याला माहितीच आहे की दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग हे बॉलीवूडचं एक प्रसिद्ध जोडपं. काही दिवसांपुर्वीच दीपिकाने लेकीला जन्म दिला. त्यानंतर हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर आता दीपिका तिच्या लेकीच्या संगोपनात पुर्णपणे दंग होऊन गेली आहे.

कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी- ब्लाऊजची निवड कशी करावी? ५ टिप्स- परफेक्ट रंगसंगतीमध्ये दिसाल स्मार्ट

पहिलं अपत्य असेल तर त्याला वाढविताना आईच्या जिवाची होणारी घालमेल वेगळीच असते. बाळाची प्रत्येक पहिली गोष्ट अनुभवताना, करताना उत्सूकता- अधीरता तर असतेच पण मनामध्ये एक भीतीसुद्धा असते. सगळं व्यवस्थित जमेल ना, ही धाकधूक असतेच. त्यात नव्या आईला सगळ्यात जास्त अलर्ट ठेवणारी गोष्ट म्हणजे बाळाचं फिडिंग, नंतर त्याला उभं धरणं, ढेकर काढणं, शी- शू बघणं आणि झोपवणं, झोप झाली की पुन्हा फिडिंग आणि मग पुन्हा तेच तेच... 

 

हे सगळं चक्र सध्या दीपिकाच्याही आयुष्यात कसं सुरू आहे, याविषयी माहिती सांगणारी एक स्टोरी तिने काही दिवसांपुर्वीच सोशल मिडियावर शेअर केली होती आणि त्याला “Feed.Burp.Sleep.Repeat.” असं कॅप्शन दिलं हाेतं.

कांजीवरम, बनारसी, प्युअरसिल्क साड्यांवर डाग पडले? २ टिप्स- साडी खराब न होता डाग निघून जातील

यामध्ये तिने एक मजेशीर व्हीडिओही शेअर केला होता. आई झालेल्या प्रत्येक स्त्री ला हे चुकलेलं नाही. मग ती अगदी एखाद्या खेड्यातली सामान्य स्त्री असो किंवा मग बॉलीवूडवर राज्य करणारी दीपिका पादूकाेण असो.. आईपणातली हुरहुर, धाकधूक, भीती, आनंद आणि मानसिक- शारिरीक ताण सगळीकडे सारखाच आहे.. नाही का?

 

टॅग्स :सोशल व्हायरलदीपिका पादुकोणरणवीर सिंग