Join us  

दीपिका पदुकोण वापरते शांत झोपेसाठी खास स्लिप मास्क, तसा मास्क वापरण्याचे 5 फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2022 5:27 PM

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दीपिका पदुकोणसारखं स्लीप मास्क लावून झोपा... स्लीप मास्क लावून झोपण्याचे 5 फायदे

ठळक मुद्दे झोपेची गुणवत्ता आणि सोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तज्ज्ञ झोपताना स्लीप मास्क लावण्याचा सल्ला देतात.

अभिनेत्री दीपिका पदुकोणने रविवारच्या पेंगुळलेल्या दुपारचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोत दीपिका स्लीप मास्क लावून झोपलेली दिसते. दीपिकाचा हा फोटो तर व्हायरल झालाच सोबतच एका विषयावर चर्चाही होते आहे, ती म्हणजे झोपताना  स्लीप मास्क लावणं का गरजेचं आहे? झोपेची गुणवत्ता आणि सोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तज्ज्ञ झोपताना स्लीप मास्क लावण्याचा सल्ला देतात. स्लीप मास्क लावून झोपल्यानं 5 फायदे होतात.

Image: Google

झोपताना स्लीप मास्क का लावावे?

1. आपल्या डोळ्यांच्या पडद्यात प्रकाशाला संवेदनशील अशा पेशी असतात. या पडद्यांच्या पेशींवर जो प्रकाश पडतो, यावरुन दिवस आहे की रात्र, प्रकाश आहे की काळोख याची संवेदना होते. या संवेदनशीलतेचा अडथळा शांत झोपलागण्यामध्ये येवू शकतो. स्लीप मास्क लावून झोपल्यानं झोपेची गुणवत्ता सुधारते. शांत आणि गाढ झोप लागते. स्लीप मास्क लावल्यानं झोपेला आवश्यक असलेल्या मेलाटोनिनचा स्तर चांगला राहातो.

2.  अनेकांना बेडवर पडल्यावर लवकर झोप लागत नाही. झोप येण्याची आराधना करावी लागते. स्लीप मास्क लावून झोपल्यानं लवकर झोप लागते. स्लीप मास्कमुळे डोळ्यांपुढे पूर्ण अंधार निर्माण होतो. त्यामुळे शरीरातील मेलाटोनिनचा स्तर वाढून लवकर झोप येते आणि झोप चांगली लागते. 

3. मानसिक आरोग्याचा विचार करता स्लीप मास्क लावून झोपण्याची सवय उत्तम मानली जातो. शांत झोपेसाठी डोळ्यांपुढे पूर्ण अंधार फायदेशीर असतो. स्लीप मास्कमुळे डोळ्यांना आराम मिळतो. मनातील भीती कमी होते.  म्हणूनच मानसिक पातळीवर शांतता मिळण्यासाठी स्लीप मास्क आवश्यक मानलं जातं.

Image: Google

4. झोपेच्या गुणवत्तेचा, मानसिक आरोग्याचा आणि त्वचेच्या आरोग्याचा विचार करता केवळ स्लीप मास्क नव्हे तर योग्य स्लीप मास्क लावून झोपणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. योग्य स्लीप मास्कमुळे त्वचा तरुण दिसण्यास मदत होते. सिल्क स्लीप मास्क वापरण्याचा सल्ला देतात. सिल्क स्लीप मास्काध्ये नैसर्गिक प्रथिनं असतात. संवेदनशील त्वचेसाठी तूती सिल्कचा समावेश असलेल्या स्लीप मास्कचा वापर करवा असं तज्ज्ञ म्हणतात. यामुळे त्वचेला होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी होतो. 

5. रात्री झोपताना पूर्ण काळोख असावा हे शास्त्रीय दृष्ट्या योग्यच पण तशी परिस्थिती वास्तवात नसते. सर्व लाइट बंद झाले तरी मोबाइलचा ब्ल्यू लाइट सतत लुकलुकत असतो. या ब्ल्यू लाइटचा शांत झोपेत अडथळा निर्माण होतो. तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही डोळ्यांवर हा ब्लू लाइट पडणं हानिकारक मानलं जातं. स्लीप मास्क लावल्यानं डोळ्यांवर पडणारा ब्ल्यू लाइट रोखला जातो.   

टॅग्स :सोशल व्हायरलआरोग्यदीपिका पादुकोण