Join us

दीपिका पादूकोणचा परीक्षेसाठी खास सल्ला, म्हणाली गणित तर माझंही कच्चंच होतं, प्रचंड भीती वाटायची कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2025 15:20 IST

Deepika was about to commit suicide but : दीपीकाने शाळकरी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. स्वतःचे अनुभवही सांगितले.

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या हल्लीच आलेल्या एका भागात  दीपीका पदुकोण हिने मुलांशी संवाद साधला.(Deepika was about to commit suicide but...) मार्गदर्शन करताना दीपीकाने पालकांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांनाच मोलाचे सल्ले दिले.  डिप्रेशन, परीक्षा, स्ट्रेस आदी सगळ्याच विषयांवर तिने मार्गदर्शन केले. परीक्षेच्या काळात मुलं फार ताण घेतात. त्याचा अभ्यासावर, मनावर कसा परिणाम होतो, यावरही ती बोलली.  दीपीका म्हणाली, "जेव्हा असं वाटतं की, काहीच पर्याय उरलेले नाहीत. मानसिक ताण वाढत चालला आहे, अशावेळी संवाद साधा. त्यात गुंतत जाऊ नका. (Deepika was about to commit suicide but...)परीक्षेची भीती वाटणे सहाजिक आहे. पण त्याचा स्वत:वर परिणाम होऊ देऊ नका."

दीपीकाने पुढे स्वत:चा अनुभव सांगितला. ती म्हणाली, "माझं गणित फारच कच्चं होतं. गणिताच्या परीक्षेमधे मला प्रचंड भीती वाटायची. पण अशावेळी मन शांत ठेवायचा प्रयत्न करा. ब्रेक घ्या.(Deepika was about to commit suicide but...) संयम प्रचंड महत्त्वाचा असतो. परीक्षेवेळी किंवा निकालावेळी भीती वाटणारच पण अशावेळी संयम ठेवा. एखादा धडा समजत नाही. आणि त्यातीलच प्रश्न परीक्षेत आले की मग तारांबळ उडते. पण जे येत नाही त्याचा विचार करू नका. जे येते त्यावर लक्ष द्या. 

दीपीकाने पुढे सांगितले, २०१४ साली तिला अचानक चक्कर आली होती. त्याचे कारण काही दिवसांनी तिला कळले. ती प्रचंड डिप्रेस होती. बरेच दिवस शांत राहिल्यावर भावनांचा बांध फुटला आणि ती आई समोर रडायला लागली. तिच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. तिच्या आईने लगेचच तिला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेले. तिच्या आईने संयम ठेवला त्यामुळे दीपीकाची मनस्थिती सुधारली. आपल्या देशात मानसोपचारतज्ज्ञाकडे जाणाऱ्या  माणसाला वेडा ठरवतात. त्यामुळे लोकं जात नाहीत. पण ही मानसिकता आता बदलत चालली आहे. 

दीपीकाने पालकांना मोलाचा सल्ला दिला आहे. ती म्हणाली, "तुमच्या मुलाची आवड-निवड जाणून घ्या. त्याची क्षमता जाणून घ्या. अभ्यासापलिकडेही गोष्टी असतात. मुलांवर दबाव नका टाकू." पुढे तिने तुलना आणि स्पर्धा या विषयांवर सल्ला दिला. ती म्हणाली, "कुठेही गेलात तरी तुलना होणारंच. स्पर्धा असणारंच. तो आयुष्याचा भाग आहे. पण त्याचा आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही. स्पर्धेला सकारात्मक समजायचे. आपली चूक सुधारण्याकडे कल ठेवायचा. स्पर्धकाचे चांगले गुण आत्मसात करा." इतरही विषयांवर तिने मुलांना मार्गदर्शन केले.               

टॅग्स :दीपिका पादुकोणपालकत्वसामाजिकशाळापरीक्षा