Join us  

Delhi man makes ice cream rolls : काय हा विचित्र प्रयोग! पठ्ठ्यानं ढोकळा, सॅण्डविच एकत्र करून बनवलं आईस्क्रिम; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 1:46 PM

Delhi man makes ice cream rolls : ही व्हायरल क्लिप इंस्टाग्रामवर द ग्रेट इंडियन फूडी नावाच्या पेजद्वारे पोस्ट केली गेली. यावर नेटिझन्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. 

सोशल मीडियावर आजकाल वेगवेगळे फूड कॉम्बिनेशन्स व्हायरल होत आहेत. मसाला डोसा आणि मोमो आइस्क्रीम रोल्सनंतर दिल्लीतील एका माणसाचा ढोकळा आणि खांडवीसह आइस्क्रीम रोल बनवण्याचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ही व्हायरल क्लिप इंस्टाग्रामवर द ग्रेट इंडियन फूडी नावाच्या पेजद्वारे पोस्ट केली गेली. यावर नेटिझन्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.  (Delhi man makes ice cream rolls with dhokla and khandvi in viral video pathetic says internet)

 व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, विक्रेता गुजराती स्नॅक्स ढोकळा आणि खांडवीचा वापरून आइस्क्रीम रोल बनवताना दिसत आहे. ढोकळा व्हर्जन बनवण्यासाठी, त्यांनी व्हॅनिला आइस्क्रीमसह स्नॅक बारीक केले आणि ते एकत्र केले. पुढे, त्याने मिश्रणातून रोल बनवले आणि ढोकळ्याचे आणखी काही तुकडे आधीच भरलेल्या प्लेटमध्ये  ठेवले. 

लग्नात नाचत होती म्हणून होणाऱ्या पतीनं कानाखाली मारली; रागारागात तिनं चुलत भावाशीच लग्नगाठ बांधली

सर्व्ह करण्यापूर्वी, त्याने रोलला छान सजवले. खांडवी आईस्क्रीम रोल बनवण्यासाठी त्या माणसाने नेमकी तीच प्रक्रिया पुन्हा केली. ऑनलाइन पोस्ट केल्यानंतर, व्हिडिओला जवळपास 2 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या विचित्र प्रयोगामुळे नेटिझन्स  संतापले आणि त्यांनी कमेंट्स विभागात आपली नाराजी व्यक्त केली. “RIP ढोकला,” अशी कमेंट एका युजरनं केली आहे. 

टॅग्स :अन्नपाककृतीसोशल व्हायरलसोशल मीडिया