गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. चर्चेचं कारण सध्या देशाभरातील 'बच्चा बच्चा जानता है'. काही दिवसांपूर्वी पूनम पांडेची मृत्यूची बातमी समोर आली होती. तिचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झाल्याची माहिती मॅनेजरने शेअर केली होती. पण तिचा मृत्यू झालाच नाही, 'मी जिवंत आहे', असं म्हणत तिने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली होती. पण हा पीआर स्टंट अतिशय वाईट असल्याचं नेटकऱ्यांच म्हणणं आहे (Social Viral). या प्रकरणामुळे #PoonamPandey ट्रेण्ड होताना दिसत आहे.
मुख्य म्हणजे या ट्रेण्डमध्ये दिल्ली पोलिसांनी उडी घेतली असून, त्यांनी लोकांना रस्ते वाहतूक सुरक्षेच्या जनजागृतीपर एक पोस्ट शेअर केली आहे (Delhi Police). सध्या ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून, लक्ष केंद्रित करणाऱ्या या पोस्टचं विशेष कौतुक होत आहे(Delhi Police shared an advisory post about road safety on X).
लेकरु धाडकन पडलं पण आईचं लक्ष डान्स रिलवर, व्हायरल व्हिडिओ-असा कसा हा नाद?
दिल्ली पोलीस म्हणतात..
दिल्ली असो किंवा मुंबई पोलीस, सोशल मिडीयावर हटके पोस्ट शेअर करून जनजागृती करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही. पोलीस डीपार्टमेण्ट नेहमी लोकांना सतर्क करण्यासाठी विविध पोस्ट शेअर करत असतात. सध्या त्यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यांनी ट्रेण्डी होणाऱ्या पूनम पांडेचा विषय घेऊन एक पोस्ट शेअर केली आहे.
लॅपटॉप स्वच्छ करताना घ्या ६ गोष्टींची विशेष काळजी, नाहीतर होतील लाखाचे बारा हजार..
व्हायरल पोस्टच्या फोटोमध्ये लिहिले की, 'तुम्ही हो तुम्हीच! तुम्ही अंडरटेकर, मिहिर विराणी किंवा कोणती स्पेशल केस नाहीत की पुन्हा जिवंत व्हाल. त्यामुळे नेहमी हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करा'. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'होय होय, इकडे तिकडे पाहू नका, तुमच्याबद्दलच बोलणं सुरू आहे.'
नेटकरी म्हणाले..
दिल्ली पोलिसांची ही अनोखी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एका युजरने लिहिले की, 'याबरोबर पूनम पांडेचं नावही यायला हवे होते'. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'हा नवीन मीमर कोण आहे? अहो, हे दिल्ली पोलिसांचे पेज आहे'. तिसऱ्या युजरने लिहिले की, 'हे दिवसेंदिवस माझे आवडते मीम पेज बनत चालले आहे.'