यंदाच्या उन्हाळ्यांत हाय गर्मी !! असं बोलण्याची वेळ आली आहे. आत्तापर्यंतच्या उन्हाळ्यातील या वर्षीचा उन्हाळा फारच भयंकर होता, असं म्हणायला हरकत नाही. या वाढत्या गर्मीमुळे घराबाहेर पाऊल ठेवणे देखील कठीण झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांत मुसळधार पाऊस पडत असला तरीही अनेक ठिकाणी अजूनही नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. काही भागात पाऊस पडत असला तरीही अजून काही ठिकाणी त्याचा पत्ताच नाही. असच काहीसं दिल्लीचं सुद्धा झालं आहे. दिल्लीतील रहिवाशांना उष्णतेमुळे घराबाहेर पडणे शक्यच होत नाही(Delhi's scorching heat turns 'besan laddu' into 'cake', the picture goes viral on social media).
या वाढत्या गर्मीचे अनेक अनुभव, प्रसंग लोक सोशल मिडीयावर शेअर करताना दिसत आहेत. याचबरोबर काहींनी उष्णतेचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होत आहे याचे वैयक्तिक अनुभव शेअर केले आहेत. यापैकीच एक प्रसंग दिल्लीतील होमिओपॅथीची डॉक्टर असणाऱ्या महिले सोबत घडला आहे, आणि तो तिने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे(It’s So Hot In Delhi That Woman’s Box Of Besan Laddoos Melted & Turned Into A Cake).
नेमकं असं काय घडलं ?
भूमिका या होमिओपॅथीच्या डॉक्टर दिल्ली एनसीआरच्या रहिवासी आहे. भूमिकाच्या आईने, भूमिकासाठी एका प्लॅस्टिकच्या डब्यांत बेसनाचे लाडू पॅकिंग करून पाठवले होते. पण, दिल्लीच्या उष्णतेमुळे हे लाडू (Doctor says her besan laddoos melted, turned into ‘cake’ due to Delhi ki garmi) वितळून जातात आणि प्लास्टिकच्या बॉक्समध्ये पूर्ण लाडूचे मिश्रण पसरून जाते व त्याचे केकमध्ये रूपांतर होते. तिने कंटेनर उघडताच हा मजेशीर प्रसंग पाहिला आणि सगळ्यांबरोबर शेअर करण्याचे ठरवले. त्यानंतर तिने कंटेनरचा फोटो काढून पोस्ट केला आहे या फोटोला तिने फारच मजेशीर कॅप्शन दिले आहे, “प्रिय, बेसनचे लाडू, तुमचे दिल्लीच्या उष्णतेत स्वागत आहे. तिचे हे कॅप्शन वाचून दिल्लीत किती उष्णता असेल याचा आपण अंदाज लावू शकतो(Delhi heatwave turns besan ladoos into cake, doctor shares pic).
सोशल मिडीयावर ही पोस्ट भूमिकाने तिच्या ऑफिशियल @thisisbhumika या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली आहे. या फोटोत एका विशिष्ट पदार्थाने भरलेला प्लॅस्टिकचा बॉक्स दिसत आहे. “केक” सारख्या दिसणाऱ्या या पदार्थापूर्वी यात गोलाकार बेसन लाडू होते ; जे अति उष्णतेमुळे वितळले आहेत.
ही पोस्ट पाहून नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहीजण हा अनोखा केक खाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. तर अनेकजण या मजेशीर प्रसंगांवरून दिल्लीच्या उष्णतेचा अंदाज व्यक्त करताना दिसत आहेत. " हा बेसनचा लाडू नाही तर बेसनचा केक आहे" असं म्हणत काही नेटकऱ्यांनी या पदार्थाची खिल्ली उडवली आहे. इतकेच नव्हे तर या पोस्टला ४.२ लाखांहून अधिक व्ह्यूज व जवळपास ९,१०० लाईक्सही मिळाले आहेत.