वरण, भात, २ भाज्या, पोळ्या, सलाड, ताक, पापड, लोणचं असं सगळं भरलेलं ताट. शिवाय हे सगळं अनलिमिटेड.. म्हणजेच ज्याला जेवढं पाहिजे, तेवढं तो मागून खाऊ शकताे. अशी साग्रसंगीत भरपेट जेवण केवळ ८० रुपयांत (Gujarati thali just in 80 rupees) देणारी गुजरातमधली गुरूकृपा खानावळ (Gujarati food) आणि ती चालविणाऱ्या तिघी बहिणी सध्या सोशल मिडियावर चांगल्याच गाजत आहेत. Denish Tanna या फेसबूक पेजवरून शेअर झालेला हा व्हिडिओ (viral video) सध्या चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओला तब्बल १७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
सोशल मिडियावर बऱ्याचदा अशा प्रेरणादायी गोष्टी बघायला मिळतात. एखाद्याचं काम, एखाद्याची जिद्द कुणाला तरी नवी उमेद, उत्साह, उर्जा देणारी ठरते.
घरच्याघरी हेअर स्ट्रेटनर वापरत असाल तर ३ गोष्टी कायम लक्षात ठेवा.. नाहीतर केसांचं होईल नुकसान
अशा प्रकारचाच हा एक व्हिडिओ आहे. सगळं कुटुंब मिळून उत्साहात खानावळ चालवत आहे, मदत सगळ्यांचीच होते आहे, पण या व्यवसायाची धुरा मात्र तिघी बहिणी सांभाळत आहेत. विशेष म्हणजे या बहिणी वयाने खूप काही मोठ्याही नाहीत. १५ ते २० वर्षे या वयोगटातल्या त्या असाव्या, असं त्यांच्याकडे बघून जाणवतं.
यावेळी बोलताना मोठी बहिणी म्हणाली की खानावळ चालवणे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. त्यांच्या आजोबांच्या काळापासून त्यांची ही खानावळ आहे.
दसरा- दिवाळीसाठी घरारा घ्यायचा की शरारा? या दोन्हीत नेमका काय फरक असतो, तुम्हाला काय शोभून दिसेल?
आजोबांच्या काळात सुरुवातीला खानावळीचे स्वरुपही मर्यादित होते. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी खानावळीचा कारभार हाती घेतला आणि आता मात्र या तिघी बहिणी पुढाकार घेऊन खानावळ चालवत आहेत. धडाडीने काम करून त्यांच्यापरीने व्याप अधिकाधिक मोठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक बहिण पोळ्या करते, कुणी वरण आणि भाज्या करते तर कुणी सगळा दिवसभराचा हिशेब सांभाळते. त्यांचं काम बघून अनेक नेटीझन्सनी या बहिणींचं मनापासून कौतूक केलं आहे.