सोशल मिडीयाच्या जमान्यात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कोणी रातोरात स्टार बनतं, तर कधी कोणाला मोठा ब्रेक मिळतो. हसवणारे पोस्ट, चॅट्स लक्षवेधी ठरतात. भाषा कोणतीही असो, व्हायरल पोस्टचा कण्टेण्ट पाहिला जातो. सध्या एका चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हायरल चॅटमध्ये वडिलांनी सॅरकॅस्टिक उत्तर देत मुलीची फिरकी घेतली.
भारतीय आई-वडील हे जरा सॅरकॅस्टिक स्वभावाचे असतात, आणि संधी मिळेल तसे ते मुलांसोबत मजाक मस्ती करतात. व्हायरल होणाऱ्या चॅटमध्ये वडिलांनी आपल्या मुलीच्या इंग्रजीवरून थोडी चेष्टा केली. इंग्रजी शाळेत शिकवूनही इंग्रजी शब्द चुकल्यामुळे त्यांनी मुलीला सॅरकॅस्टिक उत्तर दिलंय(Desi Dad Trolled Daughter : WhatsApp Chat Goes Viral).
व्हायरल पोस्टमध्ये नक्की आहे तरी काय?
बरेचसे पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत धाडतात. इंग्रजी भाषेवाचून त्यांचे काही अडू नये, हे त्यामागचे मुख्य हेतू असते. पण काही मुलं अशीही आहेत, ज्यांना इंग्रजी शाळेत शिकूनही इंग्रजी भाषेत बोलायला किंवा लिहायला जमत नाही. अशापैकी एका मुलीचा वडिलांसोबत केलेल्या चॅटिंगचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. वडिलांच्या इंग्रजी मेसेजवर त्या मुलीनं असा रिप्लाय दिला की, जे पाहून वडिलांनी 'तुला इंग्लिश शाळेत घालून माझे पैसे वाया गेले.' असा मजेशीर रिप्लाय दिलाय.
लायटरवर चिकट डाग पडलेत, मेणचट झाले? ३ घरगुती सोपे उपाय-पाणी न लावता लायटर चकाचक
व्हायरल चॅट पोस्ट एकदा पाहाच
अन्वी नावाच्या मुलीने वॉट्सअॅप स्क्रीनशॉट एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये वडील आणि अन्वीचे चॅट्स आहेत. ज्यामध्ये सुरुवातीला तिच्या वडिलांनी तिला मेसेज केला - '४० हजार रुपये तुझ्या बँकेच्या खात्यात जमा केले आहेत, बॅलन्स तपासून घे.' मुलीनं बॅलेंस तपासून पाहिला आणि त्यांना '(फाऊंड) सापडले' असा रिप्लाय दिला.
काय मग लाडू कधी देणार? असा प्रश्न सतत विचारुन छळणाऱ्या नातेवाईकांना काय उत्तर द्याल?
तिचं चुकीचं इंग्रजी पाहून वडिलांनी तिची फिरकी घेण्याचं ठरवलं. रिप्लाय देताना शिवाय तिचं इंग्रजी सुधारत वडिलांनी सॅरकॅस्टिक उत्तर दिलं. ते म्हणाले, '(रिसिव्हड) प्राप्त झाले' पुढे ते म्हणाले, 'तुला इंग्रजी शाळेत घालून माझे पैसे वाया गेले.' हे वॉट्सअॅप चॅट सध्या व्हायरल होत असून ९ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिले आहे.