Join us  

फिश कट लेहेंगा स्कर्ट; नवरीचा देखणा लूक व्हायरल! असा घागरा सुरेख बाई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 2:10 PM

Social viral: प्रसिद्ध फॅशन डिझायनर तरूण ताहिलियानी (Designer Tarun Tahiliani ) यांनी डिझाईन केलेला अतिशय सुंदर फिशकट लेहेंगा (fish cut lehenga of a bride) एका युवतीने नुकताच तिच्या लग्नात परिधान केला होता. या लेहेंग्याचे फोटो सोशल मिडियावर (photos of lehenga) चांगलेच व्हायरल झाले असून लेहेंग्यातील नववधूनचे सौंदर्य लाजवाब ठरले आहे. 

ठळक मुद्देआज काल लग्नामध्ये फिशकट लेहेंगा घालण्याचा ट्रेण्ड वाढत चालला आहे.या लेहेंग्यामुळे तुमची फिगर उठून दिसते.

लग्न म्हणजे लाल रंगाचा लेहेंगा किंवा साडी असाच काहीसा नवरीचा पोशाख (beautiful bride wearing fish cut lehenga) असेल असं आपल्या मनात येतं.. पण आता हा ट्रेण्ड थोडा थोडा बदलत चालला आहे. लाल रंगाव्यतिरिक्त इतर रंगही आता नववधू वापरत आहेत... असाच एक पीच, गुलाबी आणि गोल्डन रंगाचं कॉम्बिनेशन असणारा फिशकट लेहेंगा (fish cut lehenga fashion trend) एका नववधूने घातला हाेता. हा लेहेंगा काही साधासुधा नव्हता. तर प्रसिद्ध फॅशन डिझायनर तरूण ताहिलियानी यांनी हा लेहेंगा डिझाईन केला होता... हा लेहेंगा घालून जेव्हा ती नवरी मंडपात आली, तेव्हा खरोखरच अतिशय देखणी दिसत होती.. 

 

या लेहेंग्यावरचे ब्लाऊज, ओढणी असे सगळे काही पीच- पिंक आणि गोल्डन या रंगसंगतीतलेच होते. लेहेंग्यावरचे ब्लाऊज पेप्लम कॉर्सेट peplum-corset या प्रकारातले होते. ब्लाऊजच्या बाह्या आणि गळा याठिकाणी नेटचा वापर करण्यात आला होता. ब्लाऊजच्या बाह्या तळ हातापर्यंत लांब होत्या. तसेच ब्लाऊजची लांबीही जवळपास तिच्या कंबरेपर्यंत होती. या लेहेंग्यावरची ओढणीही नेटची होती. तिने ती ओढणी अशा प्रकारे घेतली होती की तिची हेअरस्टाईल आणि चेहरा पुर्णपणे झाकलेला होता.

लिपस्टिक सतत टचअप करायचा कंटाळा येतो? लिपस्टिक ओठांवर जास्त वेळ राहावी म्हणून ४ सोपे उपाय

पण तरीही ओढणी नेटची आणि फिकट रंगाची असल्यामुळे तिचा मेकअप आणि हेअरस्टाईल एखाद्याला अगदी स्पष्टपणे दिसू शकत होते. एखाद्या नववधूला लग्नात अशाप्रकारे ड्रेसिंग करायला आणि ओढणी घ्यायला काहीच हरकत नाही. ही हटके स्टाईल कोणत्याही नववधूला नक्कीच शोभून दिसेल. 

 

आज काल लग्नामध्ये फिशकट लेहेंगा घालण्याचा ट्रेण्ड वाढत चालला आहे. या लेहेंग्यामुळे तुमची फिगर उठून दिसते. त्यामुळे जी नवरी तब्येतीने अतिशय मेंटेन असते, ती तर हमखास लग्नात स्वत:साठी फिशकट लेहेंगा निवडते. नावावरूनच लक्षात येते की फिशकट लेहेंगा म्हणजे एखाद्या माशाप्रमाणे आकार असलेला लेहेंगा. पार्टी, रिसेप्शन यासाठी तयार होताना जर  वेस्टर्न लूक करायचा असेल, तर त्यावेळीही अनेक जणी फिशकट गाऊन घालण्यास प्राधान्य देतात. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलफॅशनब्यूटी टिप्समेकअप टिप्सलग्न