Join us  

दिया मिर्झाच्या रिसायकल मिडी ड्रेसची चर्चा, जुन्या कपड्यांतले धागे वापरुन कसा बनवला नवा ड्रेस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2023 7:51 PM

Dia Mirza flaunts her recycled midi dress : फॅशन म्हणजे भारंभार कपडे, आणि सतत नवे कपडे खरेदी, दिया मिर्झा म्हणते हे पर्यावरणासाठी चांगलं नव्हे...

दिया मिर्झा (Dia Mirza)एक फॅशनिस्टा आहे. ती वेगवगेळ्या फॅशनेबल आऊटफिट्स मधले फोटो नेहमीच पोस्ट करत असते. दिया नेहमीच पर्यावरणाची काळजी घेण्यात कायम पुढे असते. आता फॅशनमध्येही तिने Sustainable फॅशनचा एक नवा ट्रेंड सुरु केला आहे. दियाने नुकतीच ग्रीनप्रेन्योर ऑफ द इयर २०२३ ही पदवी मिळविली आहे आणि तिच्या इको-कॉन्शियस फॅशन निवडींसाठी ती आता सर्वत्र ओळखली जाते. गेल्या वर्षी तिनी पर्यावरणासाठी केलेल्या कामाची दखल घेत नुकताच चॅम्पियन्स ऑफ चेंजचा पुरस्कारही तिला बहाल करण्यात आला आहे(Dia Mirza Stuns in Printed Blue Maxi Dress Paired With Matching Long Shrug)

तिने अलीकडेच 'प्लॅनेट इंडिया'च्या लॉन्चिंगच्या वेळी रिसायकल केलेला एक सुंदर मिडी ड्रेस (Dia Mirza, in a recycled outfit, speaks of sustainable fashion) परिधान केल्याचे पाहायला मिळते. या कार्यक्रमासाठी, दियाने वेशभूषा डिझायनर आणि ख्यातनाम स्टायलिस्ट थिया टेकचंदनेय यांनी डिजाईन केलेल्या पोशाखाची निवड केली आहे.  दिया मिर्झा 2017 पासून संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या सदिच्छा दूत आहे. दिया स्वच्छ हवा, स्वच्छ समुद्र, वन्यजीव संरक्षण आणि हवामान बदलाबाबत जनजागृतीसाठी काम करत आहे. तिच्या लग्नातही तिने पर्यावरणाचा कमी अपव्यय व्हावा आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचू नये याची काळजी घेतली होती. इतकंच नाही तर दिया स्वतःच्या आयुष्यात आणि तिच्या आजूबाजूला, तिच्या टीमच्या लोकांना आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये जागृती करत राहते आणि त्यांना आयुष्यात प्लास्टिक सोडून पाणी वाचवायला प्रोत्साहित करते. दियाने पुन्हा एकदा तिच्या पोशाखाने लोकांना सस्टेनेबल फॅशनचा संदेश दिला आहे(Dia Mirza stuns in a ‘completely recycled’ outfit).

दिया मिर्झाच्या रिसायकल मिडी ड्रेसची होतेय चर्चा... 

दिया मिर्झाने 'प्लॅनेट इंडिया'च्या लॉन्चिंगच्या वेळी रिसायकल केलेल्या एका सुंदर मिडी ड्रेसची चर्चा सर्वत्र होत आहे. दियाने केप - लॉन्ग जॅकेटसोबत जोडलेला मोठा पायघोळ, अनारकली मिडी ड्रेस घातला होता. ती घातलेले लॉन्ग जॅकेट व आतील ड्रेस दोन्ही रीसायकल साहित्यपासून बनवलेले होते. तिचा हा रीसायकल आऊटफिट बनवताना संपूर्ण निळ्या रंगाचा मिडी ड्रेस होता आणि त्यावर पांढऱ्या रंगात गुंतागुंतीचे भौमितिक नमुने दाखवले आहेत. एवढेच नव्हे तर तिने यावर लांब बाह्यांचा एक श्रग घातला होता. या निळ्या रंगाच्या ड्रेसला साजेसे असे ऍक्सेसरीझ देखील तिने यावर घातले होते. तिने आपल्या रीसायकल लूकला अधिक उठाव देण्यासाठी सिल्व्हर ऑक्सिडाइज्ड झुमके आणि त्यावर शोभून दिसतील असे काळे शूज घातले होते. या सगळ्या ड्रेसला शोभून दिसेल अशी हेअर स्टाईल सुद्धा तिने केली होती. संपूर्ण केसांना हलकेच कर्ल करून तिने ते मोकळे सोडले होते. या सगळ्या आऊटफिटला सूट होईल असा अगदी मोजकाच मेकअप केला होता. तिच्या मेकअपमध्ये काळे आयलाइनर, मस्करा-लेडन आयलॅशेस, कंटोर केलेले गाल आणि न्यूड लिपस्टिक यांसारखे सूक्ष्म बारकावे दाखवून चेहेऱ्याला उठाव दिला होता. तिच्या या अगदी कमी मेकअप करण्यामुळे तिचा इको-फ्रेंडली लुक पूर्ण झाला होता. 

साड्या ठेवण्यासाठी कपाटात जागाच उरली नाही ? १ सोपी ट्रिक, छोट्याशा कपाटातही राहतील भरपूर साड्या...

कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...

कपड्यांच्या रिसायकल ड्रेसबद्दल दिया सांगते... 

दियाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन डिझायनरबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. गुजरातमधील 'सोच' या एनजीओच्या सहकार्याने टिल्लाने हाती घेतलेल्या झिरो - वेस्ट उपक्रमावर 'रिसायकल प्रोजेक्ट'वर प्रकाश टाकला. तिने स्पष्ट केले की हा प्रकल्प पिंधारडा आणि जवळपासच्या गावांमधील महिलांना केवळ शाश्वत रोजगारच देत नाही तर त्यांना त्यांच्या कलागुणांचा शोध घेण्यास प्रोत्साहित करतो. या उपक्रमांत जुन्या फॅब्रिक स्क्रॅप्सचा पुन्हा नव्याने वापर करून, त्यांचे रूपांतर कपडे आणि रजाईसाठी पॅचवर्क प्रकारांतील कापड बनवण्यासाठी केला जातो. या स्क्रॅप फॅब्रिक्सचे नवीन डिझाईन्समध्ये रूपांतर करून नवनवीन कपडे व कापड तयार केले जाते. दिया आणि टीम कोणतेही रिसायकल कापड तयार करताना हे सुनिश्चित करते की कोणत्याही कारागिराचे श्रम आणि प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत.

वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...

 रिसायकल फॅशन ट्रेंड विषयी दिया काय सांगते...

तिच्या एका मुलाखतीत बोलताना दिया म्हणाली होती की, टिकाऊ फॅशनशी संबंधित एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आपण काय खरेदी करतो ते कुठे, कसे तयार केले जाते हे पाहणेही महत्वाचे आहे. रासायनिक मुक्त रंगांनी रंगवलेले कपडे विकत घ्या किंवा ते जिथे बनवले जातात तिथे सर्व नैसर्गिक साहित्य वापरून हाताने बनवलेले कपडे खरेदी करा. आपल्या प्राचीन कलेचे प्रतिबिंब असलेले कपडे, हे सर्व टिकाऊ फॅशनचा भाग आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरलफॅशन