Join us  

पॅरिसच्या हॉटेलमध्ये हरवली ६. ७ कोटींची अंगठी, आणि सापडली कुठे तर..वाचा ही विचित्र गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2023 4:25 PM

Woman Lost Her Diamond Ring Worth Rs. 6.7 Crore: पॅरिसच्या रिट्ज या अतिशय अलिशान हॉटेलमध्ये एका मलेशियन महिलेची कोट्यावधी रुपयांची हिरेजडित अंगठी हरवली... आणि ती अंगठी बघा नेमकी कुठे सापडली ( Diamond ring found in a surprising place)...

ठळक मुद्देतिच्या त्या अंगठीला तब्बल ६. ५१ कॅरेटचा हिरा जडवलेला होता. 

प्रवासात महागड्या वस्तू सोबत असल्या की त्या हरवण्याची नेहमीच धास्ती वाटते. आणि जर त्या चुकून कुठे हरवल्या तर मग होणारी जीवाची घालमेल आणि झालेले नुकसान यांचा विचारही करवत नाही. पॅरिसला फिरायला गेलेल्या त्या मलेशियन महिलेची अवस्थाही यापेक्षा काही वेगळी नव्हती. हा किस्सा आहे पॅरिस येथील अतिशय अलिशान हॉटेलपैकी एक असणाऱ्या रिट्स हॉटेलमधला. ती हरवलेली अंगठी सापडली. पण ती अशाठिकाणी सापडली ज्याचा विचारही कुणी केला नसेल. (Diamond ring of a woman worth Rs 6.7 crore lost in luxury paris hotel found in a surprising place)

 

तर त्याचं झालं असं की काही दिवसांपुर्वी एक मलेशियन व्यावसायिक महिला रिट्स हॉटेलमध्ये मुक्कामाला होती. त्यावेळी तिच्या हातात तिने घातलेली ६.७ करोड एवढ्या किमतीची हिरेजडीत प्लॅटिनम अंगठी होती. रात्री त्या महिलेने ती अंगठी बेडवर काढून ठेवली. दुसऱ्यादिवशी तिचं आवरून झालं आणि ती हॉटेलबाहेर पडली. सायंकाळी पुन्हा ती जेव्हा हॉटेलमध्ये आली तेव्हा तिला बेडवर ती अंगठी दिसली नाही. त्यामुळे तिने त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये अंगठी चोरल्याची तक्रार केली. तिच्या त्या अंगठीला तब्बल ६. ५१ कॅरेटचा हिरा जडवलेला होता. 

ड्रेसच्या रंगानुसार लिपस्टिकची शेड कशी निवडायची? बघा ६ टिप्स- दिसाल आणखी सुंदर- आकर्षक

त्या तक्रारीनंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी अंगठीचा कसून शोध घेतला. पण तरीही त्यांना ती सापडली नाही. ती महिलाही नंतर तिच्या पुढच्या कामासाठी लंडनला निघून गेली.

संत्र्यांच्या साली फेकू नका, कुंडीतल्या रोपांसाठी टॉनिक! ४ जबरदस्त फायदे- बघा कसा करायचा वापर

त्यानंतर दोन दिवसांनी चक्क व्हॅक्यूम क्लिनरच्या बॅगमध्ये ती अंगठी अडकलेली दिसून आली. अंगठी आढळून येताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ तिला आणि पोलिसांना निरोप दिला. अंगठी मिळताच त्या महिलेने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचे, त्यांच्या प्रामाणिकपणाचे भरपूर कौतूक केले. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलमहिलापॅरिस