क्युट गर्ल आलिया भट्ट (Alia Bhatt) बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये देखील, आपल्या अभिनयाचा डंका सातासमुद्रापार गाजवत आहे. नुकतंच तिला 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटातील भूमिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या खास सोहळ्यासाठी आलिया भट्ट पती रणबीर कपूरसह दिल्लीतील विज्ञान भवन येथे पुरस्कार घेण्यास पोहोचली तर खरी, पण प्रत्येकाच्या नजरा तिच्या साडीवर होत्या.
या खास क्षणासाठी आलिया भट्टने खूपच सुंदर लूक कॅरी केला होता. मुख्य म्हणजे तिने या सोहळ्यासाठी लग्नाची साडी नेसण्याचे ठरवले. आलियाचा नेमका लूक कसा होता? आलियाने लग्नाची साडी का रिपीट केली? पाहूयात(Did Alia Bhatt Repeat Her Wedding Saree For 69th National Film Awards Ceremony?).
आलियाने नेसली लग्नातील साडी
बहुतांश अॅक्टर पुन्हा त्यांचा लूक कॅरी करत नसल्याते बोलले जाते. आणि बरेच कलाकार पुन्हा त्याच लुकमध्ये कॅमेरासमोर येतही नाहीत. पण आलियाने लोकांची ही समज मोडून काढली आहे. आलिया भट्टने ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी, खास ऑफ व्हाइट कलरची साडी नेसली होती, व ही साडी तिने तिच्या लग्नातही नेसली होती. ही साडी सब्यसाचीने डिझाइन केली होती. यासह तिने ज्वेलरी म्हणून गळ्यात चोकर नेकलेस आणि स्टड इअररिंग्स घातले होते.
अमिताभ बच्चन रोमॅण्टिक आहेत का? जया बच्चन म्हणतात, रोमॅण्टिक आहेत पण..
आलियाने केसांचा बन बांधला होता, व केसात फुले माळली होती. आलिया या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. आलिया सोबत या सोहळ्याला हजर असलेल्या रणबीर कपूरने ब्लॅक इंडो-वेस्टर्न आऊटफिट परिधान केले होते.
गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अवॉर्ड
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. मुख्य म्हणजे आतापर्यंत या चित्रपटाने ५ मुख्य श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. चाहत्यांनीही या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. या चित्रपटात आलिया भट्टसह शंतनू माहेश्वरी, विजय राज, अजय देवगण, जिम सरभ यांसारखे स्टार्स देखील मुख्य भूमिकेत झळकले होते.