घरातील भांडी घासण्याचं काम कोणाला आवडतं तर कोणाला नाही. भांडी साफ करण्यासाठी अनेक साबण, लिक्वीड बाजारात उपलब्ध आहेत. जे भांड्यांना नवी चमक देण्याचे मदत करतात. मात्र, काही भांडी घासली की त्याची चमक निघून जाते. या कारणाने आपण भांडी वापरण्याचे टाळतो. ते भांडे वापरण्या योग्य असतात. मात्र, चमक निघून गेल्यामुळे आपण ते वापरण्याचं टाळतो. त्या भांड्यांना जर नवी चमक द्यायची असेल तर काही घरगुती उपायांचा वापर करून पाहा. भांड्यांना नवी चमक तर मिळेल यासह वापरण्यायोग्य देखील होतील.
कांद्याचा रस आणि व्हिनेगर
कांद्याचा रस आणि व्हिनेगर त्वचा आणि केसांच्या संबंधित समस्या सोडवण्यासाठी गुणकारी तर आहेच, यासह भांडी चमकवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. कांद्याचा रस आणि व्हिनेगर भांड्यांना पॉलिश करण्यासाठी वापरण्यात येऊ शकते. याच्या मदतीने आपण स्टील, अॅल्युमिनियमची भांडी चमकवू शकता.
लिंबू आणि मीठ
पितळेची भांडी काळी पडली की ती अजिबात चांगली दिसत नाहीत. आपण ही भांडी लिंबू आणि मीठाचा वापर करून पॉलिश करू शकता. भांडी चमकण्यासाठी लिंबूवर थोडे मीठ शिंपडा आणि पितळेच्या भांडी घासून घ्या. साध्या पाण्याने धुतल्यानंतर भांडी पुसून घ्या.
लिंबू आणि बेकिंग सोडा
काही वेळा भांड्यांच्या तळाशी भरपूर तेल साचते. जे निघता निघत नाही. याने भांड्यांची चमक निघून जाते. तेलकट तवा अथवा भांडी स्वच्छ करण्यासाठी भांड्यांवर लिंबू आणि बेकिंग सोडा चोळा शेवटी घासून घ्या. असे केल्याने अतिरिक्त तेल निघून जाईल.