Lokmat Sakhi >Social Viral > आजीबाईंची गोष्ट पेंग्विनला आवडली की काय? भर रस्त्यात रंगलेल्या गप्पांचा व्हायरल व्हिडिओ

आजीबाईंची गोष्ट पेंग्विनला आवडली की काय? भर रस्त्यात रंगलेल्या गप्पांचा व्हायरल व्हिडिओ

Viral Video व्हायरल व्हिडिओमध्ये आजी आणि पेंग्विनची पार्किंगमध्ये भेट घडते. त्यात दोघांमध्ये गप्पा सुरु होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2022 01:40 PM2022-12-14T13:40:21+5:302022-12-14T13:41:52+5:30

Viral Video व्हायरल व्हिडिओमध्ये आजी आणि पेंग्विनची पार्किंगमध्ये भेट घडते. त्यात दोघांमध्ये गप्पा सुरु होतात.

Did the penguin like the grandmother's story? Viral video of street gossip | आजीबाईंची गोष्ट पेंग्विनला आवडली की काय? भर रस्त्यात रंगलेल्या गप्पांचा व्हायरल व्हिडिओ

आजीबाईंची गोष्ट पेंग्विनला आवडली की काय? भर रस्त्यात रंगलेल्या गप्पांचा व्हायरल व्हिडिओ

वयस्कर व्यक्तीचे बॉडींग लहानग्यांशी, प्राण्यांशी सहजरीत्या घट्ट होऊन जाते. ते अधिकाधिक आपला वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवतात. वय झाले की प्रत्येक व्यक्ती आपलं मन छोट्या मोठ्या गोष्टीत रमवतात. त्यांचे मन एका बालकाप्रमाणे निर्मळ आणि प्रेमळ बनते. सध्या एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्या वयस्कर महिलेची निरागसता पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला काहीसा अचंबित करेल. कारण यात एक महिला चक्क पेंग्विनसह गप्पा मारत आहे. नक्की घडलं काय तुम्हीच पहा.

या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला छत्री घेऊन रस्त्यावरून जात आहे. रस्त्याच्या मधोमध तिची आणि पेंग्विनची भेट घडते. भेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये संभाषण सुरु होते. का कोणास ठाऊक, पेंग्विन मात्र त्या वृद्ध महिलेचं बोलणं कान देऊन ऐकत आहे. हे दृश्य पाहून असे वाटते जणू काही नातवाचे आणि आजीच्या गप्पा सुरु आहेत.

वृद्ध महिलेच्या हातात असणारी छत्री या पेंग्विनला आवडली असेल असा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. काहींनी आजीच्या निरागसतेचे कौतुक केलं आहे. या व्हिडीओमधील अनोख्या संवादाने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

Web Title: Did the penguin like the grandmother's story? Viral video of street gossip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.