Join us

हे पाहिलं का चपातीGPT, पोळी किती गोल आता मोजणार AI! आता बोला, येते का गोल चपाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2025 19:52 IST

Did you see this chapatiGPT ? AI will now rate your roti skills : पाहा तुम्हाला पोळी लाटता येते का?

मी पोळ्या जास्त गोल लाटल्या का तू? आपल्या भावंडांबरोबर हा वाद तर होतच असतो. (Did you see this chapatiGPT ? AI will now rate your roti skills)पण आता कोणाची पोळी जास्त गोल आहे, ते तपासण्यासाठी आईला त्रास देऊ नका. तुमचा मोबाइल सांगेल पोळीचा आकार किती चांगला झाला आहे ते. चेहरा बघून वय सांगणारे फिचर मध्यंतरी फार चालत होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने काहीही करता येते. हे हळूहळू सिद्ध होत आहे. एका आयआयटी खडकपूरच्या माझी विद्यार्थ्याने एक वेगळाच शोध लावला आहे. (Did you see this chapatiGPT ? AI will now rate your roti skills)लग्नाच्या चाचण्या घेणार्‍या सासूसाठी लावलेला शोध असावा. पोळी किती गोल लाटली गेली आहे. याची चाचणी करणारं तंत्र त्याने शोधलं आहे. सोशल मिडियावर लोकांनी त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. 

एका सोशल मिडिया यूझरने त्यानी लाटलेल्या पोळीचा फोटो पोस्ट करत पोळी लाटणं कला आहे. (Did you see this chapatiGPT ? AI will now rate your roti skills)असं कॅप्शन लिहिलं होतं. त्यावर कमेंट करत अमिष चौहान नामक मुलाने त्याचे एआय.ड्राईव्ह टुल सोशल मिडियावर टाकले. नंतर ते पाहून काहींना हसू आवरलं नाही, तर काहींना ते फारच कौशल्याचं वाटलं. त्याला लोकांनी खरचं असं काही आहे का विचारलं. त्यावर अमिषने माझ्या पोस्टला ४२० लाईक्स आले तर टुल पब्लिश करतो असं सांगितलं. बघता-बघता त्याची पोस्ट सुसाट व्हायरल झाली. लोकांनी गुगलवरही त्याच्या साईटसाठी गर्दी केली.   

अमिषने सांगितले त्याला कामाचा कंटाळा आलेला. म्हणून त्याने टाईमपास करायला ते टुल तयार केलं. सहज मज्जा म्हणून रोटीचेकर.एआय असं टुल तयार केलं आणि त्याकडे कधी लक्ष दिलं नाही. त्याला कधी वाटलं ही नव्हतं लोकांना ते एवढं आवडेल. त्याचा आता ते टुल खरचं पब्लिश करायचा विचार आहे. रोटीचेकअर.एआय.डोव और डाय असं नाव देऊन त्याने गोल रोटी चॅलेंज कमींग सून अशी पोस्ट केली. लोकांना हा प्रकार फारच इंट्रेस्टिंग वाटत आहे.  

रोटी चेकर वापरण्यासाठी त्या साईटवर जाऊन कॅमेरा ओपन करायचा. लाटलेल्या पोळीवर धरायचा. मग तुमच्या पोळीच्या आकाराला शंभर पैकी गुण दिले जातात. तेवढी चांगली ती पोळी लाटली गेली. असा त्याचा अर्थ असेल. 

टॅग्स :तंत्रज्ञानआर्टिफिशिअल इंटेलिजन्सऑनलाइनगुगल