फॅशनेबल दिसण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्याची लोकांची तयारी असते. फॅशन ब्रॅण्ड वेगवेगळे प्रयोग करून आऊटफिट्स तयार करतात. यासाठी त्यांनी खूप डोकं लावावं लागतं. सध्या सोशल मीडियावर इटॅलियन ब्रॅण्ड क्लोदिंग लाईन डीजल (Diesel) खूप चर्चेत आहे. डिझेल ब्रँड त्याच्या नवीनतम कलेक्शनमधून एक पोशाख घेऊन आला आहे. जो आजकाल सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय बनत आहे. हा पोशाख असा आहे की मॉडल्स समोर येताच लोकांनी त्याची थट्टाच केली नाही तर त्याची किंमत ऐकून आश्चर्यचकीत झाले. याचे कारण असे की त्याची रचना इतकी खराब होती की कोणीतरी तुम्हाला ते मोफत दिले तरीही तुम्ही ते वापरणं टाळाल. (Italian retail clothing company diesel 74000 skirt leaves internet shocked)
खरं तर, हे सर्व त्यावेळचे आहे जेव्हा डिझेल ब्रँडने त्याच्या '2022 स्पेशल क्लोदिंग' कलेक्शनमधील काही हिट डिझाईन्स काढल्या होत्या. यात टॉपपासून ड्रेसेसपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होता, पण जेव्हा रॅम्पवर शॉर्ट स्कर्ट घातलेली एक मुलगी समोरून चालत आली तेव्हा तिला पाहून सगळेच थक्क झाले. कारण ते असे होते की, ते पाहिल्यावर लोकांना याला स्कर्ट म्हणावे की बेल्ट म्हणावे हेच कळत नव्हते. लेदरमध्ये बनवलेल्या या पोशाखाचा पॅटर्न इतका लहान होता की त्याने स्कर्टची व्याख्या पूर्णपणे बदलली.
या ब्रॅण्डनं हा मिनी स्कर्ट तीन रंगांमध्ये डिझाइन केला आहे, एक राखाडी-तपकिरी आणि तिसरा चेरी रेड शेड आहे. त्यात एक लहान बटण देखील आहे, जे इलास्टिकसह असल्याचे दिसते. समोरच्या बाजूला ब्रँडचा एक मोठा लोगो देखील आहे, जो सर्वाधिक लक्ष वेधून घेत होता. याची लांबी एवढी कमी होती की तुम्हाला उठताना आणि खाली बसताना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. याची किंमत 795 पौंड म्हणजेच 74,576 रुपये आहे.