सध्या क्युआर कोड सर्वत्र वापरण्यात येत आहे. कॅशलेस पेमेंट न करता अॉनलाईन पेमेंट अधिक करण्यात येत आहे. संपूर्ण भारत डीजीटल झालं असून, यातून व्यवहार करणे सोप्पे झाले आहे. साधा भाजी विक्रेता असो या बूट पॉलिशवाला प्रत्येक जण कॅशलेस व्यवहार करताना दिसून येत आहे. भारतीय संस्कृतीत आपल्याला कोणत्याही गोष्टीचा आनंद झाला तर आपण ढोल ताशा वाजवणाऱ्याला बोलावतो. त्यांना आपण स्वः खुशीने शगुन देतो. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ढोल वाजवत असलेल्या माणसाने ‘शगुन’ घेण्यासाठी QR कोड ढोलवर लावला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका लग्न कार्यक्रमाचा सोहळा दिसून येत आहे. त्यात अनेक जण आनंदाने नाच गाणी करत आहेत. मात्र, या सोहळ्यात हटके डान्स लक्ष वेधून घेत नसून, एक ढोल सर्वांचं लक्ष वेधून घेण्यास यशस्वी ठरला आहे. कारण त्या ढोलकावर एक क्यूआर कोड आहे, जो स्कॅन करून लोक ढोलक वाजवत असलेल्या माणसाला ‘शगुन’ देत आहेत. व्हिडीओमध्ये ‘ये सही है भाई’ असा आवाजही येत आहे. अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ''लग्नात डिजिटल शगुन, डिजिटल इंडियाचा विस्तार!''
सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर डिजिटल भारत असे कमेंट करत कौतुक केलं असून, हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.