Join us

संत्र्याच्या सालांचे करा होममेड लिक्विड डिशवॉश, भांड्यांना येईल नवी चमक - होईल पैशांची बचत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2025 19:20 IST

Dishwashing Liquid From Orange Peels : How to make dishwashing liquid from orange peels : Homemade Orange Cleaner : How to make a dishwashing liquid with orange peels : संत्र्यांच्या सालीं फेकून न देता करा होममेड लिक्विड डिशवॉश, तेलकट - करपलेली चिकट भांडी देखील होतील स्वच्छ..

किचनमधील भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण डिशवॉश लिक्विड किंवा साबणाचा वापर करतो. यामुळे रोजच्या वापरातील भांडी स्वच्छ होतातच, परंतु तेलकट- चिकट किंवा करपलेली जळकी (Dishwashing Liquid From Orange Peels) भांडी घासण्यासाठी फार मेहेनत घ्यावी लागते. काहीवेळा डिशवॉश लिक्विड (How to make dishwashing liquid from orange peels) किंवा साबणाचा वापर करून देखील भांड्यांवरचे चिकट - तेलकट, काळे जळके डाग जात नाहीत. अशावेळी भांड्यांवरचे हे डाग घालवण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करून पाहतो. या घरगुती उपायांपैकीच संत्र्याच्या सालींचा (How to make a dishwashing liquid with orange peels) एक खास उपाय देखील आपण करून पाहू शकतो. हिवाळ्यात संत्री फार मोठ्या प्रमाणांत बाजारांत विकायला येतात, अशाप्रकारे संत्री खाऊन आपण शक्यतो त्याच्या साली फेकून देतो. परंतु या संत्र्याच्या साली फेकून न देता आपण त्याचा अनेक प्रकारे वापर करु शकतो.

संत्र्याच्या सालींचा वापर आपण त्वचा आणि केसांसाठी करु शकतो. तसेच गार्डनिंगसाठी देखील याचा वापर करू शकतो याचबरोबर किचन आणि घराच्या स्वच्छतेसाठी देखील संत्र्यांच्या साली फायदेशीर ठरतात. संत्र्याच्या सालीच्या उपयोगाने तुम्हाला घरातील अनेक छोटी मोठी काम करता येतील. याच संत्र्याच्या सालींचा वापर करून आपण भांडी स्वच्छ करण्यासाठी देखील करू शकतो. संत्र्यांच्या सालींपासून होममेड लिक्विड डिशवॉश घरच्याघरीच कसा तयार करायचा ते पाहूयात.   

साहित्य :- 

१. संत्र्याच्या साली - २ कप२. पाणी - ३ ग्लास ३. डिटर्जंट पावडर - २ टेबलस्पून ४. बेकिंग सोडा - २ टेबलस्पून ५. पितांबरी पावडर - २ टेबलस्पून ६. बेकिंग पावडर - १ टेबलस्पून 

पदार्थ तळताना घरभर धूर होतो? पाहा ४ ट्रिक्स, धूर न होता पदार्थ होतील पटकन तळून...

त्वचेच्या स्वच्छतेसाठी लूफा वापरताय, पण त्याच्या स्वच्छतेच काय ? बघा 'लूफा' स्वच्छ करण्याची भन्नाट आयडिया...

कृती :- 

१. सगळ्यात आधी संत्र्याच्या साली एका पॅनमध्ये घेऊन त्यात पाणी ओतावे. आता गॅसच्या मंद आचेवर हा पॅन ठेवून पाण्यात संत्र्याच्या साली ५ ते ७ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्याव्यात. २. थोड्यावेळानंतर या संत्र्याच्या शिजवून घेतलेल्या साली एका मिक्सरच्या भांड्यात घ्याव्यात. ३. आता मिक्सरच्या भांड्यात या संत्र्याच्या सालींसोबतच कोणतीही डिटर्जंट पावडर आणि बेकिंग सोडा, बेकिंग पावडर व पितांबरी पावडर घालावी. 

पुदिन्याची जुडी विकत आणण्यापेक्षा कुंडीत लावा छोटंसं हिरवंगार पुदिन्याचं रोप, ताजा पुदिना मिळेल घरच्याघरीच...

४. त्यानंतर मिक्सरमधून हे सगळे जिन्नस एकत्रित करून वाटून घ्यावे. त्याची पातळसर पेस्ट तयार करून घ्यावी. ५. सगळ्यात शेवटी हे तयार घरगुती संत्र्यांच्या सालींचे लिक्विड डिशवॉश एका बाटलीत भरून स्टोअर करून ठेवावे. ६. या लिक्विड सोपची आपल्याला जशी कंन्सिस्टंन्सी हवी असेल तितके त्यात गरजेनुसार पाणी घालावे. 

अशाप्रकारे संत्र्याच्या साली फेकून न देता त्यापासून झटपट तयार होणारे होममेड लिक्विड डिशवॉश वापरण्यासाठी तयार आहे. भांडी घासायच्या साबणाऐवजी आपण या लिक्विड डिशवॉशचा वापर करु शकता. याचबरोबर हा नॅचरल घरगुती लिक्विड डिशवॉश वापरल्याने भांडी तर स्वच्छ होतील शिवाय आपल्या हातांच्या आरोग्यासाठी देखील असा नॅचरल लिक्विड डिशवॉश वापरणे फायदेशीर ठरेल.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स