दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. त्यामुळे दिवाळीच्या (diwali celebration) चार दिवसांत आपण आपल्या घरात, अंगणात, रांगोळीमध्ये असे ज्याठिकाणी जमतील तिथे भरपूर दिवे लावतो आणि दिपोत्सव साजरा करतो. जेवढे अधिक दिवे किंवा पणत्या लावू तेवढा अधिक दिपोत्सवाचा आनंद मिळतो, वातावरण प्रसन्न वाटते. पण बऱ्याचदा उत्साहाच्या भरात किंवा मग गाफिल राहिल्याने हा दिपोत्सव आपल्याच अंगलट येतो आणि त्यातूनच चटका बसण्याच्या, कपडे जळण्याच्या घटना घडतात. असा प्रकार आपल्या घरी होऊ नये, आणि दिवाळी आनंदाची- उत्साहाची जावी, यासाठी दिपोत्सव (7 safety rules for diwali celebration) साजरा करताना या काही गोष्टींची काळजी नक्की घ्या (How To Celebrate Safe Diwali?).
दिवाळीत दिवे किंवा पणत्या लावताना काय काळजी घ्याल?
१. घरात लहान मुले असतील तर शक्यतो पायऱ्यांवर, अंगणामध्ये दिवे ठेवूच नका. आपल्या जाण्या- येण्याच्या मार्गात दिवे असतील, तर त्याला कपडा लागून पेट घेण्याची जास्त शक्यता असते. त्याऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या कृत्रिम दिव्यांचा वापर करा.
पेडिक्युअर करण्यासाठी पार्लरमध्येच कशाला जायला हवं? फक्त २ स्टेप्स.. पाय दिसतील खूप सुंदर
२. अनेक जण गॅलरीमध्ये किंवा घराच्या कम्पाउंड वॉलवर दिवे ठेवतात. चुकून धक्का लागून किंवा मग गडबडीत दिवा उचलताना किंवा ठेवताना तिथून तो पडण्याची शक्यता असते. अशावेळी खाली कुणी उभं असेल तर अपघात होऊ शकतो.
३. रांगोळीमध्ये शक्यतो एकच दिवा लावा आणि तो ही रांगोळीच्या मधोमध. कारण आजूबाजूला रांगोळी असल्याने कुणी थेट दिव्यापर्यंत जात नाही. त्यामुळे तो सुरक्षित असतो.
४. ज्या दिव्यांचा किंवा पणत्यांचा बेस चांगला आहे, असेच दिवे लावा. लुंडकणाऱ्या, हलणाऱ्या पणत्या लावू नकाच.
५. हँगिंग दिवे शक्यतो लावू नका. खूपच हौस असेल तर ते दिवे टांगून त्यावर बॅटरीवर चालणारे कृत्रिम दिवे ठेवून द्या.
बाई गृहप्रवेश करताय की फुटबॉल खेळताय? माप ओलांडून घरात येणाऱ्या नवरीचा व्हायरल व्हिडिओ..
६. दिवे लावताना आपण ते सगळे एका ताटात घेतो आणि मग एकेका जागी नेऊन ठेवतो. ते ताट खूप उथळ नाही ना, दिवे त्यात व्यवस्थित बसले आहेत ना, याची काळजी घ्या. नाहीतर त्या जागेवर नेऊन मग दिवे पेटवा. पेटवलेले दिवे ठेवण्यासाठी प्लास्टिकचा ट्रे वापरणे टाळा.
७. पुजेच्या चौरंगाच्या अगदी जवळ दिवा ठेवू नका. पूजा करताना चुकून चटका बसू शकतो.
८. यंदा दिवाळीतही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस असेल तर लाईटिंग नकोच. कारण त्यामुळे करंट बसण्याचा धोका असतो.