दिवाळी (Diwali) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे (Cleaning Tips). दिवाळी सुरु होण्याआधी आपण संपूर्ण घराची साफसफाई करतो. शिवाय फराळही करतो. मात्र, दिवाळीपूर्वी साफसफाई करणं हे कंटाळवाणे वाटते (Diwali Cleaning). हा टास्क पूर्ण करण्यासाठी संपूर्ण दिवस जातो. दिवाळीला स्वच्छ घर हवेच. पण घराच्या साफसफाईचे काम खूप अवघड आहे. अनेक वेळा मेहनत करूनही अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. शिवाय साफसफाई केल्यानंतर शरीर थकते ते वेगळं. थकवा आल्यानंतर पुढची कोणतीही कामं करू वाटत नाही.
घराची सफाई नक्की कुठून करावी? असा प्रश्न अनेकांना पडतो. जर आपल्याला झटपट पद्धतीने घराची सफाई करायची असेल तर, काही गोष्टी लक्षात ठेवा. या काही क्लिनिंग टिप्समुळे काही तासात संपूर्ण घराची सफाई होईल(Diwali Cleaning: 4 Hacks & Tips for House Cleaning).
साफ सफाई करण्यापूर्वी प्लॅन तयार करा
साफसफाई करताना बराच वेळ जातो. जर घरात जास्त खोल्या असतील तर, आधी कामं वाटून घ्या. जी खोली मोठी असेल ती आधी स्वच्छ करून घ्या. जेणेकरून घरातला मोठा भाग आधी स्वच्छ होईल. नंतर बाकीच्या खोल्या स्वच्छ करून घ्या.
जेवणानंतर 'ही' चूक केली तर पश्चाताप अटळ, वजन वाढते झरझर! ५ मिनिटं ‘एवढं’ करा...
खोलीतील कपाट आणि ड्रॉवर स्वच्छ करा
खोलीची सफाई झाल्यानंतर कपाट आणि ड्रॉवर स्वच्छ करा. कपाटातील सर्व कपडे व्यवस्थित लावा. याशिवाय शो पीस असलेल्या कपाटाची धूळ काढून ओल्या कापडाने पुसून घ्या. खोलीतील प्रत्येक कोपरा स्वच्छ करा.
खिडक्या आणि दरवाजे स्वच्छ करा
घरातील सर्व खिडक्या आणि दरवाजे स्वच्छ करण्यासाठी, आधी क्लीनरने क्लिन करा, शेवटी ओल्या कापडाने पुसून घ्या. यामुळे खिडक्या आणि दरवाजे नव्यासारखे चमकतील.
भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..
स्नानगृह आणि स्वयंपाकघर स्वच्छ करा
खोल्या स्वच्छ झाल्यानंतर स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्या. भांडी, फ्रिज, ट्रोली, एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करून घ्या. शेवटी बाथरूम आणि टॉयलेट क्लिन करा. कामाची विभागणी केल्यानंतर घरातील स्वच्छता झटपट होईल.