Join us  

स्वयंपाकघर स्वच्छ करताना नाकीनऊ येतात? ५ रुपयाच्या 'या' गोष्टीचा करा वापर; पूर्ण किचन होईल स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2024 2:49 PM

Diwali Cleaning: 4 Tips to Make Your Kitchen Sparkle! : ४ सोपे किचन क्लीनिंग टिप्स आणि हॅक्स

स्त्री आपला जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये घालवते (Cleaning Tips). स्वयंपाक करणं हे खरंच अवघड काम. पण ऊन असो किंवा पाउस तिला स्वयंपाकघरात घाम गाळत स्वयंपाक करायला लागतोच (Kitchen Tips). दिवसभराच्या कामानंतर नियमित स्वयंपाकघर स्वच्छ करणं जमेलच असे नाही (Diwali). अस्वच्छ स्वयंपाकघरामुळे घरात रोगराई पसरते.

आता काही दिवसांवर दिवाळी हा सण येऊन ठेपला आहे. दिवाळीची सुरुवात आधी साफसफाईनेच होते. हॉल, बेडरूम स्वच्छ साफ केल्यानंतर आपण किचनमध्ये वळतो. स्वयंपाकघराची साफ करणं म्हणजे वेळखाऊ आणि मेहनतीचं काम. जर आपल्याला सोप्या आणि झटपट पद्धतीने स्वयंपाकघराची साफिया करायची असेल तर, काही गोष्टी लक्षात ठेवा. बऱ्याचदा महागड्या क्लीनरचा वापर करूनही स्वच्छता होत नाही. यासाठी काही घरगुती टिप्स फॉलो करून पाहा(Diwali Cleaning: 4 Tips to Make Your Kitchen Sparkle!).

ऑनलाइन साडी दिसते खूप सुंदर पण घरी येते लो क्वालिटी? 

बेकिंग सोडा

बेकिंग सोडायचा वापर स्वयंपाकात होतो. पण  कधी याचा वापर साफसफाईसाठी करून पाहिलं आहे का? बेकिंग सोड्याच्या वापराने आपण बऱ्याच गोष्टी स्वच्छ करू शकता. स्वयंपाकघरातील सिंक, ओव्हन, खिडक्या, मायक्रोवेव्ह आणि स्टोव्ह यासह जवळजवळ प्रत्येक गोष्ट साफ करण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यामुळे चिकट डाग सहज निघतील.

मुलं रात्री लवकर झोपत नाहीत? दंगा करतात? आईबाबांसाठी ५ टिप्स; मुले झोपतील शांत

लिंबू आणि व्हिनेगर

स्वयंपाकघरातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकता. शिवाय भांड्यांवरचे खाद्यपदार्थांचे वास घालवण्यासाठी आपण लिंबाचा वापर करू शकता. लिंबू आणि व्हिनेगरच्या मिश्रणाने आपण कॅबिनेट आणि टाईल्सही स्वच्छ करू शकता. सर्वात आधी लिंबू आणि व्हिनेगरचं मिश्रण लावा, नंतर ओल्या कापडाने स्वच्छ करा.

डिश लिक्विड

डिश लिक्विडच्या वापराने आपण स्वयंपाकघरातल्या बऱ्याच गोष्टी स्वच्छ करू शकतो. यासाठी वाटीमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात डिश लिक्विडचे ५-६ थेंब मिसळा. स्प्रे बॉटलमध्ये मिश्रण भरा, आणि शेगडीवर स्प्रे करा. काही मिनिटांनंतर स्क्रबरने शेगडी घासून काढा. मिनिटात शेगडी स्वच्छ होईल. 

टॅग्स :दिवाळी 2024स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल