दिवाळी अवघ्या काही दिवसांवरच राहिली आहे. दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधी डोक्यात येतं ते म्हणजे दिवाळीची साफसफाई. (Home Tips) सण-उत्सवांच्यावेळी घराचा प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ केला जातो. हात फिरे तिथ लक्ष्मी वसे असं म्हटलं जातं. म्हणूनच खास-उत्सवांच्यावेळी घर चकचकीत, स्वच्छ ठेवलं जातं. (Cleaning House for Diwali)
घरात स्वच्छता असेल तर घर नीटनेटकं दिसतं. (Diwali Cleaning Hacks) कितीही साफसफाई केली तरी घर स्वच्छ दिसत नाही, पसारा दिसतो अशी अनेकांची तक्रार असते. घर स्वच्छ करताना जर काही टिप्स लक्षात ठेवल्या तर घर नेहमी स्वच्छ नीटनेटकं दिसेल. (Thing to throw out from house during diwali cleaning tips)
जुने, धुळ लागलेले तोरण काढून टाका
कोणताही चांगल्या मुर्हूतावर किंवा कोणत्याही पुजेच्या दिवशी आपण दरवाज्यावर तोरण लावतो. पण कापडाचे तोरण धूळ लागून लागून जुने, मळकट दिसू लाहतात. याशिवाय त्यावर जाळे सुद्धा लागते. मळलेले, घाणेरडे तोरण लावल्यामुळे घरातील पॉझिटिव्ही कमी होऊ शकते. अशात जर दिवाळीची साफसफाई करताना नवीन तोरणं लावून लावून डेकोरेशन करा.
जुने फर्नीचर
अनेकदा घरातलं फर्नीचर वर्षानुवर्ष तसंच ठेवल्यामुळे खराब होतं किंवा पाणी लागून फुगते. अशा स्थितीत बराचवेळ फर्नीचर तसंच ठेवल्याने त्यात किटक होऊ शकतात. वापरात नसलेले फर्नीचर दिवाळीची साफ-सफाई करताना काढून टाका. वापरात नसलेले फर्नीचर दुरूस्त करून तुम्ही कोणालाही वापरण्यासाठी देऊ शकता.
भांड्याची मांडणी चिकट -कळकट झालीये? 5 टिप्स-स्टीलची मांडणी दिसेल नव्यासारखी, स्वच्छ
जुने कपडे
कपाटात असे अनेक कपडे असतात जे घट्ट असतात किंवा जास्त लूज होतात तर काही कपड्यांचा रंग निघालेला असतो. असे कपडे साफ-सफाई झाल्यानंतर पुन्हा कपाटात ठेवणं टाळा. जुने कपडे कोणत्याही गरजू व्यक्तीला देऊ शकता किंवा जास्त खराब झाले असतील तर ते फेकून द्या.
खंडीत मुर्तीचे विजर्सन करा
अनेकदा घरात अशा मूर्ती असतात ज्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे खंडीत होतात. दिवाळीची साफ-सफाई करताना पूजा घरात जर अशा मूर्ती किंवा प्रतिमा दिसल्या तर विसर्जन करा किंवा कोणत्याही रिसायकलिंग एजंसीशी संपर्क करून तुम्ही त्यांना या मूर्ती देऊ शकता.
घरातल्या पायपुसण्या काळ्या, मळकट झाल्यात? ३ टिप्स, कमी मेहनतीत स्वच्छ होतील पायपुसण्या
तुटलेल्या वस्तू
आपल्या सर्वांच्याच अशा वस्तू असतात ज्या वापरात नसतात पण नंतर कामात येतील म्हणून घरात अनेक दिवस पडून असतात. असं न करता तुटलेल्या वस्तू वेळीच घराबाहेर ठेवा यामुळे घरात मोकळी जागा होईल आणि नवीन वस्तू ठेवता येतील. अनेक महिन्यांपासून वापरात नसलेला सामान फेकून द्या. कारण अशा वस्तू घरात जास्त नकारात्मक उर्जा आणू शकतात.