Lokmat Sakhi >Social Viral > रोज धूळ बसल्याने सोफा मळकट-खराब झालाय? ५ उपाय करा, नव्यासारखा-स्वच्छ दिसेल सोफा

रोज धूळ बसल्याने सोफा मळकट-खराब झालाय? ५ उपाय करा, नव्यासारखा-स्वच्छ दिसेल सोफा

Diwali House Cleaning How To Clean a Sofa at Home : खर्च न करता १५ मिनिटात तुम्ही सोफा नव्यासारखा स्वच्छ करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 05:11 PM2023-11-05T17:11:01+5:302023-11-09T17:48:40+5:30

Diwali House Cleaning How To Clean a Sofa at Home : खर्च न करता १५ मिनिटात तुम्ही सोफा नव्यासारखा स्वच्छ करू शकता.

Diwali Cleaning Tips How To Clean a Sofa at Home : 5 Simple Ways to Clean a Sofa | रोज धूळ बसल्याने सोफा मळकट-खराब झालाय? ५ उपाय करा, नव्यासारखा-स्वच्छ दिसेल सोफा

रोज धूळ बसल्याने सोफा मळकट-खराब झालाय? ५ उपाय करा, नव्यासारखा-स्वच्छ दिसेल सोफा

दिवाळीच्या आधी सगळेजण घरात साफ-सफाई करतात. (Diwali Home Cleaning Tips) पण साफसफाई करण्यात बराचवेळ जातो. (Diwali Cleaning Tips) साफसफाई करण्यात तासनतास निघून जातात. घर स्वच्छ ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमचं अवघड काम सुद्धा सोपं होईल. तेलाचे, रंगाचे, खाण्यापिण्याचा इतर पदार्थांचे डाग सोफ्याला सतत लागतात.  खर्च न करता १५ मिनिटात तुम्ही सोफा नव्यासारखा स्वच्छ करू शकता. (sofa cleaning at home) यामुळे घरही चकचकीत स्वच्छ दिसेल. 

घरच्याघरी सोफा कसा स्वच्छ करावा? (How To Clean Sofa at Home)

१) सोफा स्वच्छ करण्याआधी कुशन्स आणि उशीचे कव्हर काढून त्यावरील धूळ, माती स्वच्छ करून घ्या. सोफा स्वच्छ करण्यासाठी  घरी उपलपब्ध असलेल्या वस्तूंचा तुम्ही वापर करू शकता. यासाठी सगळ्यात आधी १ लिटर पाण्यात २ चमचे शॅम्पू आणि २ चमचे लिंबाचा रस मिसून एक क्लिनिंग लिक्विड तयार करा.

२) जर सोफ्याचे कापड सिंथेटिक असले तर तुम्ही स्पॉन्जच्या साहाय्याने स्वच्छ करू शकता. दुसरे कापड असेल तर स्क्रॉचच्या ब्रशने स्वच्छ करा. वरचे कापड क्लिनिंग लिक्वीडमध्ये घालून ठेवा आणि सोफा व्यवस्थित रगडून स्वच्छ करा. सोफा व्यवस्थित साफ झाल्यानंतर उन्हात सुकवण्यासाठी ठेवा. बाजारात सोफा स्वच्छ करण्यासाठी अनेक सर्विस सेंटरर्स असतील पण तिथे तुम्हाला फार पैसे खर्च करावे लागतील. 

साध्या आहारातून प्रोटीन-कॅल्शियम हवंय? सकाळी उठल्यानंतर खा ५ पदार्थ: एनर्जेटिक-फिट राहाल

३) सोफ्यातून खूप घाणेरडा वास येत असेल तर सोफा स्वच्छ करण्यासाठी बेकींग सोडा उत्तम ठरेल. यासाठी  बेकींग सोडा शिंपडून ३० मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर वॅक्युर क्लिनरच्या मदतीने सोफ्याची साफसफाई करा. वॅक्यूम क्लिनर कोपऱ्यातील सर्व घाण निघून जाईल.

४) ओलाव्यामुळे लेदर किंवा रेक्सिनमध्ये बुरशी लागली असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी, प्रथम सोफा स्वच्छ कापडाने पुसून टाका. यानंतर, दुसरे कापड घ्या आणि त्यावर थोडे रबिंग अल्कोहोल घाला. बुरशी आणि घाण दूर करण्यासाठी या कपड्याने सोफा स्वच्छ करा.

पोट सुटेल म्हणून रात्री भात कमी खाता? या पद्धतीने भात शिजवा-पोटभर भात खाऊन स्लिम राहाल

५) पॉलिस्टरचे कापड असेलला सोफा स्वच्छ करण्यासाठी, स्वच्छ-ओलसर स्पंज वापरा. डाग असलेल्या भागावर हलक्या हाताने घासून घ्या. जर डाग निघत नसेल तर पाणी आणि डिश वॉशने स्वच्छ करा.

Web Title: Diwali Cleaning Tips How To Clean a Sofa at Home : 5 Simple Ways to Clean a Sofa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.