Join us  

पितळेच्या मुर्ती चमकतील लख्ख, ३ सोप्या ट्रिक्स-पितळेच्या वस्तू उजळतील ५ मिनिटांत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 4:04 PM

How To Clean Brass Idols At Home (Pitlechya murti kasa clean karaycha) : देवघरातील पितळाच्या मूर्ती अनेक दिवस एकच ठिकाणी राहिल्यामुळे त्यावर मॉईश्चर येते आणि काळेपणा दिसून येतो.

दिवाळीच्या वेळेस घरातील साहित्य, एकूण एक सामान स्वच्छ केले जाते. (Tips For Cleaning Pital Murti)दिवाळीच्या दिवसांत देवी लक्ष्मी घरांत प्रवेश करते आणि ज्या ठिकाणी साफसफाई स्वच्छता असते त्याच ठिकाणी लक्ष्मीचे वास्तव्य असते. (pitlechya murti kasa clean karaycha) देवघरातील पितळाच्या मूर्ती अनेक दिवस एकच ठिकाणी राहिल्यामुळे त्यावर मॉईश्चर येते आणि काळेपणा दिसून येतो. पितळाच्या मूर्तींचा काळेपणा हटवण्यासाठी काही सोप्या टिप्स फायदेशीर ठरू शकतात. (Diwali Cleaning Tips) ज्यामुळे तासनतास  न घासता, न रगडता तुम्ही मुर्ती स्वच्छ करू शकाल. (Tips For Cleaning Pital God Idols At Home)

लिंबू आणि बेकींग सोडा

सगळ्यात आधी लिंबाचा रस आणि बेकींग सोडा मिसळून पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टमध्ये सुती कापड भिजवून ते मूर्तीवर लावा आणि रगडून स्वच्छ करा. २० मिनिटं तसंच ठेवल्यानंतर पाण्याने मूर्ती स्वच्छ करा. 

व्हिनेगर आणि गव्हाचे पीठ

पितळाच्या मूर्ती चमकवण्यासाठी तुम्ही पीठ किंवा व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी हे दोन्ही पदार्थ समान प्रमाणात घेऊन व्यवस्थित मिसळून त्याची पेस्ट तयार करा.  त्यानंतर सैंधव मीठ या पेस्टमध्ये मिसळा.  मूर्तीवर ३० ते ४० मिनिटांसाठी तसेच लावलेले राहू द्या. नंतर गरम पाण्याने मूर्ती क्लिन करा.

घराच्या बाल्कनीत लावा सुंदर क्लाईंबिग प्लांट्स; खर्च १०० रूपयांपेक्षा कमी, वेलींनी सजेल घर

टोमॅटो सॉस

पितळाच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वर सांगितलेल्या वस्तूंव्यतिरिक्त टोमॅटो केचअप, लिंबू किंवा मिठाच्या पेस्टचाही वापर करू शकता.  ही पेस्ट काहीवेळासाठी मूर्तीवर लावून तसंच सोडून द्या. यामुळे पितळाच्या मूर्तीवरचा काळेपणा दूर होईल.

चिंचेचे पाणी

चिंचेच्या पाण्याने पितळाची चमक परत आणण्यास मदत होते.  यासाठी चिंच १५ मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवा आणि मग मूर्तीवर व्यवस्थित घासून घ्या. यासाठी तुम्ही सॉफ्ट स्क्रबचाही वापर करू शकता.  १० मिनिटांसाठी तसंच सोडल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

घरातल्या टॉयलेट सीटवर काळे-पिवळे डाग पडले? ३ ट्रिक्स, स्वच्छ दिसेल टॉयलेट-दुर्गंध येणार नाही

जर तुम्हाला हे उपाय करण्यासाठी फार वेळ नसेल तर तुम्ही बाजारात मिळणाऱ्या पावडरने मूर्ती स्वच्छ करू शकता. गुलाबी रंगात ही पावडर उपलब्ध होते. पितळाच्या भांड्याच्या दुकानात भांडी स्वच्छ करण्याचे लिक्वीडसुद्धा मिळते. कापसाच्या बोळ्यावर हे  लिक्विड लावून तुम्ही मूर्ती कमी वेळात स्वच्छ क्लिन करू शकता.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजनहोम रेमेडी