दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. (Diwali Cleaning Tips) सर्वजण साफसफाईच्या तयारीत आहेत. सगळी साफ सफाई एकत्र करायची म्हटलं की नको वाटतं आणि शरीरही थकते. घराची साफसफाई करताना पडदे सुद्धा क्लीन केले जातात. (Right Way to Clean Curtains Without Washing)
हॉल, बेडरूम किंवा खिडकीला लावलेले पडदे धुळीने मळले असतील तर घराची शोभा बिघडते घर कळकट दिसते. पण पडदे धुण्याचं अवघड काम सोपं करण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता ज्यामुळे कमीत कमी वेळात पडदे एकदम चांगले धुवून होतील आणि नव्यासारखे दिसतील. या ट्रिक्स टाइम सेविंग असल्यामुळे कमीतकमी वेळात तुमचं काम उरकून होईल. (Curtains Cleaning Tips)
अपेक्स स्पेशालिस्ट क्लिनिंगच्या रिपोर्टनुसार पडदे स्वच्छ करण्यासाठी सगळयात आधी खिडक्या स्वच्छ ठेवणं फार महत्वाचे आहे. घरातल्या खिडक्या स्वच्छ असतील असे पाहा. रोजच्या रोज खिडक्या स्वच्छ करा. पदड्यांना हवा लागू द्या. कारण खिडकी उघडून मोकळी हवा आत येऊ दिली तर पडद्यांना वास येत नाही. शुद्ध हवा घरात येते. पडद्यांना स्टिम क्लिनिंग करा. या उपायांनी पडदा धुण्याची झंझड न करता पडदे स्वच्छ धुवून होतील.
1) सगळ्यात आधी पडद्यावरची धूळ साफ करा
दरवाज्यांवर लावल्यामुळे पडद्यावर धुळीचा मोठा थर जमा झालेला असतो. ज्यामुळे पडदे मळकट दिसतात. अशात त्यावरची धूळ साफ करणं खूप महत्वाचं असतं. धूळ साफ करण्यासाठी सगळ्यात आधी पडदे खाली काढून घ्या. हाताने किंवा काठीने धूळ झटकून घ्या. त्यानंतर पडदा व्यवस्थित पसरवून वॅक्युम क्लिनरच्या मदतीने धूळ माती साफ करा.
पोट फार सुटलं-लठ्ठ दिसता? पेरूच्या पानांचा जादूई उपाय, १ आठवड्यात बघा दिसेल फरक
2) पडदे ऊन्हात ठेवा
जर घरातील पडद्यांना बरीच धूळ लागली असेल तर अशा स्थितीत तुम्हाला पडदे ऊन्हात ठेवणं फायदेशीर ठरू शकतं. धूळ लागलेले पडदे ३ ते ४ तास उन्हात सुकवले तर घाणेरडे पडदे साफ होण्यास मदत होईल. उन्हामुळे पडद्यांवरील बॅक्टेरिया नष्ट होण्याबरोबरच पडद्यांना येणारा दुर्गंधही कमी होतो.
ओटी पोट-मांड्या जाड दिसतात? १ ग्लास पाण्यात हे २ पदार्थ घालून प्या, सुडौल दिसाल
३) स्टिम क्लिनिंग करा
न धुता पडद्यांवरील माती साफ करण्यासाठी तुम्ही स्टिम क्लिनिंग करू शकता. वॅक्यूम क्लिनरच्या मदतीनं पडद्यांवरील धूळ जितकी निघेल तितकी काढून टाका. जेव्हा तुम्ही स्टिम क्लिन करून पडदे साफ कराल तेव्हा पडद्यांवर लागलेले डाग-धूळ दूर होण्यास मदत होईल. तुम्ही यात व्हाईट व्हिनेगर घालू शकता. जेव्हा पडद्यांवर स्टिम क्लिन कराल तेव्हा पडद्यांवर लागलेले डाग हलके पडू लागतील.