घरामध्ये बाहेरचे धुळीचे पाय येऊ नयेत याशिवाय फरश्यांवर धुळ, मातींच्या पायांचे डाग पडू नये म्हणून डोअर मॅट ठेवल्या जातात जेणेकरून घरात धूळ, घाणीचे पाय येणार नाहीत. (Cleaning House for Diwali) पायपुसण्या जड असतात आणि सुकायलाही वेळ लागतो म्हणून पायपुसण्या वारंवार धुवायला महिला कंटाळा करतात. (How to Clean Door Mats) घाणेरड्या डोअरमॅटमुळे घर सुद्धा घाण दिसतं. म्हणूनच घर स्वच्छ, साफ ठेवणं गरजेचं असतं. (How to clean door mat easily at home)
डोअर मॅट स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लिनरचा वापर करावा लागेल असं नाही. तुम्ही घरच्याघरी लिक्विड तयार करून डोअर मॅट क्लिन करू शकता. डोअरमॅट धुण्याआधी त्यावरचं लेबल नक्की वाचा. मॅट्स वेगवेगळ्या फॅब्रिक्सपासून तयार झालेल्या असतात. (How To Clean Door Mats Best Tips) या मॅट्स तुम्ही हाताने किंवा मशिनने धुवू शकता. पायपुसणी तुम्ही सॉफ्ट ब्रशच्या मदतीने स्वच्छ करू शकता. यामुळे त्यावरील धूळ, माती सहज निघून जाईल. (3 Tips on How to Clean Entrance Floor Mats)
शॅम्पूचा वापर
मॅट स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या क्लिनर गरज नाही. शॅम्पूनेही मॅट साफ करू शकता. शॅम्पूमध्ये हार्ट केमिकल्स नसतात. यामुळे मॅटला कोणतंही नुकसान न पोहोचवता मॅट स्वच्छ करता येते. (Home Cleaning in Diwali) एका बादलीत कोमट पाणी घ्या. त्यात २ शॅम्पूचे पॅकेट्स घाला. पाणी शॅम्पूमध्ये व्यवस्थित मिसळा त्यानंतर हे शॅम्पूचे लिक्विड व्यवस्थित मिसळा. यात डोअरमॅट भिजवा. जवळपास १ तासानंतर मॅट स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
बेकींग सोडा
पायपुसणीवर कसलेही डाग पडले तर दिसायला खूपच खराब दिसते. हे डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांचा वापर करू शकता. क्लिनिंगसाठी बेकींग सोडा फायदेशीर ठरेल. बेकींग सोड्यात ब्लिचिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे घाण सहज स्वच्छ होते. याशिवाय व्हिनेगरसुद्धा उपयोगी ठरते.
भांड्याची मांडणी चिकट -कळकट झालीये? 5 टिप्स-स्टीलची मांडणी दिसेल नव्यासारखी, स्वच्छ
हे दोन्ही इंग्रेडिएंट्सस डाग काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतात. एका बाऊलमध्ये २ ते ३ चमचे बेकींग सोडा घ्या. त्यात अर्धा कप व्हिनेगर मिसळा. त्यानंतर याची जाडसर पेस्ट बनवा. ही पेस्ट डाग असलेल्या ठिकाणी लावा. काही वेळानंतर ब्रशने रगडून स्वच्छ करा आणि कोमट पाण्याने मॅट धुवून स्वच्छ करा.
रबरची पायपुसणी कशी स्वच्छ करायची
रबरची पायपुसणी तुलनेने जड असते. या पद्धतीने मॅटवर लागलेली घाण सहज स्वच्छ होईल. अशी पायपुसणी साफ करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणा नाही. रबर मॅट स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला लॉन्डरी डिटर्जेंटची आवश्यकता असेल. डिटर्जेंटच्या मिश्रणात कापड भिजवून त्याने पायपुसणी स्वच्छ करा.