Join us  

सोफा मळकट-खराब झालाय? १ चमचा बेकिंग सोड्यानं चमकेल सोफा, नवा सोफा आणला असं वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 8:32 PM

How To Clean Sofa At Home : बेकिंग सोड्यानं लेदरचा सोफा साफ करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि बेकिंग सोडा मिसळा. नंतर डिश डिटर्जेंटचे काही थेंब घाला

सोफा (Sofa) बेडरूमचा एक महत्वपूर्ण भाग आहे. खोलीची सुंदरता वाढवण्यासह खोली आरामदायक ठेवण्यासाठी सोफा फायदेशीर ठरतो. सोफ्यावर अनेकजण दिवसभर बसून टिव्ही पाहतात. तर काहीजण जेवण, नाश्ता सोफ्यावर बसून करतात. सोफ्यावर खाण्यापिण्याचे तसंच धुळ बसल्यामुळे काळपट डाग पडतात. हे डाग वेळीच साफ केले नाही तर जास्त गडद बनतात. अशावेळी ड्राय क्लिनिंगची आवश्यकता असते. जे खूपच खर्चीक असू शकतं. (Sofa Cleaning Tips)

सोफा साफ करण्याचा अत्यंत सोपा उपाय तुम्ही ट्राय करू शकता. ज्यामुळे अजिबात खर्च येणार नाही. बेकिंग सोड्याच्या वापरानं सोफा क्लिन ठेवण्यास मदत होते. सोफ्याचे डाग काढून टाकण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो. बेकिंग सोडा आणि पाणी समान प्रमाणात घेऊन स्टिम क्लिनरनं काऊची साफ-सफाई करू शकता. यासाठी एका छोट्या भांड्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी आणि बेकिंग सोडा मिसळा नंतर या पेस्टमध्ये सॉफ्ट ब्रिसल्सचा ब्रश बुडवून डाग असलेली जागा स्वच्छ करा.सर्क्युलर मोशनमध्ये डाग हलक्या हातानं स्वच्छ करा. 

चेहरा डल दिसतोय-डार्क सर्कल्स आलेत? रात्री व्हिटामीन ई कॅप्सूल या पद्धतीनं लावा, चेहऱ्यावर येईल तेज

बेकिंग सोड्यानं लेदरचा सोफा साफ करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि बेकिंग सोडा मिसळा. नंतर डिश डिटर्जेंटचे काही थेंब घाला. बॉटल व्यवस्थित हलवून घ्या आणि एका मुलायम कापडात या मिश्रणाचा स्प्रे करा. नंतर लेदर सोफा वरून साफ करायला सुरूवात करा. सर्क्युलर मोशनमध्ये  कापडानं पुसत सोफा सीट साफ करा. क्लिजिंगच्या या प्रोससमध्ये सोफ्याचा बाजूचा आणि बॉटमचा भाग स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे.

सोफा साफ करण्यासाठी सगळ्यात आधी सोफ्याचे कुशन बाजूला करा. सोफ्यातून दुर्गंध दूर करण्यासाठी सोफा कुशनच्या वर आणि खाली बेकिंग सोडा शिंपडा नंतर जुन्या टुथब्रशच्या मदतीने रगडून स्वच्छ करा. सोफा जास्त खराब होऊ नये यासाठी हार्ड ब्रिसल्सचा टुथब्रश वापरू शकता.  नंतर एक तासासाठी तसंच सोडून द्या.

 दंड खूपच जाड आहेत? 'या' १० पॅटर्नचे युनिक ब्लाऊज शिवा; कोणतीही साडी असो बारीक दिसाल

उरलेली पावडर साफ करण्यासाठी तुम्ही वॅक्यूम क्लिनरचा वापर करू शकता, ज्यामुळे सोफा चमकेल. याशिवाय एका झाकणाला कापड बांधून झाकणाच्या खालच्या बाजूनं सोफा घासून स्वच्छ करा. कापडाची गाठ ही झाकणाच्या वरच्या बाजूला असावी. यामुळे सोफा नव्यासारखा दिसेल.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स