Join us  

फरशी घाण, कळकट झालीये? लादी पुसताना ३ ट्रिक्स वापरा, आरश्यासारखी चमकेल फरशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 7:37 PM

Diwali Cleaning Tips : रंग देताना, पंखे स्वच्छ करताना किंवा घरातील कोणत्याही वस्तूंची साफसफाई करताना फरशी खराब होते. 

दिवाळीच्या आधी प्रत्येक घरांत साफसफाई केली जाते. देशभरातील लोक घर स्वच्छ, ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. (Diwali Home Cleaning) घराघरांमध्ये सफाईनंतर नवीन सामान आणून ठेवले जाते. रंग देताना, पंखे स्वच्छ करताना किंवा घरातील कोणत्याही वस्तूंची साफसफाई करताना फरशी खराब होते. काही डाग इतके हट्टी असतात की डिटर्जेंट लावूनही हे डाग निघत नाहीत.  (Diwali House Cleaning Tips)

रंग टाईल्स किंवा फरश्यांवर चिकटून राहतो. हे डाग महिनोंमहिने निघत नाहीत. सण-उत्सवांच्या काळात घरात पाहुणे येतात अशावेळी घर नीटनेटकं, टापटीप दिसावं यासाठी काही सोप्या क्लिनिंग टिप्स फायदेशीर ठरू शकतात. (Tips and Tricks DIY Solution to Remove the Toughest Stains From a Tile Floor)

1) लादी पुसण्यासाठी सगळ्यात आधी नेहमी पुसतो त्याप्रमाणे पाण्यात फिनाईल किंवा डिटर्जेंट घालून लादी पुसा. जर व्यवसस्थित पुसूनही लादी व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही इतर उपायही करू शकता. जर फरशीवर ग्रीसचे डाग लागले असतील आणि तो भाग चिकट झाला असेल तर असे डाग काढून टाकण्यासाठी कार्बोनेट सोडा आणि गरम पाण्याचे मिश्रण घ्या.  तुम्ही यात सर्फ मिसळू शकता. हे मिश्रण लावल्याने जमिनीवर लागलेले ग्रीसचे डाग लगेच निघून जातील. 

2) सगळ्यात आधी लादी पुसण्याचे कापड हायड्रोडन पेरोक्साईडमध्ये मिसळा नंतर ज्या ठिकाणी लाग लागले असतील तिथे कापडाने रगडून स्वच्च करा. यासाठी एकदम स्वच्छ कापडाचा वापर करा. नंतर दुसऱ्या ठिकाणचे  डाग स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ कापडाचा वापर करा नंतर पाण्याने स्वच्छ करा. यानंतरही टाईल्स किंवा फरशीवर डाग असतील तर ऑक्सिजन बेस्ड क्लिनरचा वापर करा. ऑक्सिजन बेस्ड क्लिनर डाग असलेल्या ठिकाणी लावून ब्रश करा.  रगडल्यानंतरर १५ मिनिटांनी पाण्याने धुवून स्वच्छ करा.

3) फरशीवर लागलेले डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही बोरोक्सचा वापर करू शकता. दोन चमचे बोरेक्स पावडरंंमध्ये  ४ लिटर पाणी मिसळा. या मिश्रणाने फरशी आणि टाईल्स नियमित स्वच्छ करा. डाग लागलेल्या ठिकाणी बोरेक्स पावडर लावून डाग स्वच्छ करा. याचा वापर केल्यास डाग कमी होण्यास मदत होईल.  

टॅग्स :सोशल व्हायरलदिवाळी 2022सुंदर गृहनियोजन