भांडी धुण्याचं काम सगळ्यात जास्त किचकट आणि कंटाळवाणं वाटतं. हे काम खूपच बोअरिंग आणि वेळखाऊ असतं. खासकरून दिवाळी किंवा इतर सणासुधीच्या दिवशी भांडी धुणं म्हणजे खूपच अवघड वाटतं. घरात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात अशावेळी भांडी भरपूर निघतात. भांडी धुण्यात बराच वेळही जातो. काही सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही भांडी धुण्याचं अवघड काम एकदम सोपं करू शकता आणि तुम्हाला जास्त कष्टही लागणार नाहीत. (Tips To Clean Dirty And Greasy Utensils Fast Festival Special Cleaning Tips)
भांडी धुण्याच्या कामात तुम्हाला आळस येत असेल तर तुम्ही काही मिनिटांतच भांडी चमकवू शकता. यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करू शकता. एका मोठ्या टपात पाणी घ्या त्यात २ चमचे बेकिंग सोडा आणि २ कप व्हिनेगर घालून मिक्स करा. नंतर घाणेरडी भांडी यात १५ मिनिटांसाठी ठेवा. नंतर स्वच्छ पाण्यानं ही भांडी धुवून घ्या.
हाडं कमजोर झाली? पोकळ हाडांना कॅल्शियम देतात इवल्याश्या बिया; चमचाभर खा-निरोगी राहा
एल्युमिनियमची कढई, कुकर गॅसवर जेव्हा ठेवलं जातं तेव्हा त्यावर काळे डाग पडतात. हे डाग स्वच्छ करण्यात बराचवेळ जातो. मीठ आणि डिटर्जेंटचा वापर करून तुम्ही हे डाग सहज साफ करू शकता. यासाठी भांड्यात पाणी घेऊन २ चमचे मीठ आणि एक चमचा डिटर्जेंट घालून मिक्स करा. नंतर गॅसवर उकळण्यासाठी ठेवा. गॅस वरून उतरवल्यानंतर साध्या स्क्रबच्या मदतीनं धुवा. तरीसुद्धा डाग निघत नसतील तर लिंबानं रगडून धुवा. या उपायानं एल्युमिनियमची कढई, कुकर नव्यासारखा चमकेल.
भांड्यावर लागलेलं तेल, मसाले आणि तुपाचा चिकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता. गरम पाण्यानं तेल किंवा तुपाची भांडी स्वच्छ करू शकता. ज्यामुळे तुमची भांडी स्वच्छ होतील. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही गरम पाण्यात डिशवॉश लिक्विड मिक्स करू शकता.