Join us  

दिवाळीला पाण्याखालची रांगोळी काढण्याची बघा १ खास ट्रिक- करा सुंदर डेकोरेशन- घर सजेल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2023 11:43 AM

Under Water Rangoli Designs For Diwali: एखाद्या तबकात किंवा ताटात काढलेली पाण्याखालची रांगोळी तुम्ही पाहिली आहे का, बघा ही खास ट्रिक आणि काढा पाण्यााखालची सुंदर रांगोळी....(rangoli decoration tips)

ठळक मुद्देटिपॉयवर ठेवायला किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात सजवून ठेवायला ही रांगोळी छान आहे.

दिवाळीला किंवा कोणताही इतर सण असला तर जमिनीवर तर सगळ्याच जणी रांगोळी काढतात (Diwali decoration ideas). त्यात काही जणी रंग वापरून तर काही जणी फुलं वापरून रांगोळी काढतात. आता रांगोळीचे हे नेहमीचे तेच ते प्रकार नको असतील तर यंदा ही एक हटके रांगोळी काढून पाहा (rangoli decoration tips). पाण्याखालची रांगोळी किंवा पाण्यावर तरंगणारी रांगोळी असे प्रकार तुम्ही पाहिले असतीलच. हे प्रकार जेव्हा आपण पाहतो, तेव्हा खरंतर ते पाहून आश्चर्य वाटतं. ही रांगोळी कशी काढली असावी (How to draw under water rangoli?), याचं अप्रुप वाटतं. पण खरंतर रांगोळीचा हा प्रकार अतिशय सोपा असून आता आपण ती कशी काढायची ते पाहूया (Under Water Rangoli Designs For Diwali)....

 

पाण्याखालची रांगोळी कशी काढायची?

ही रांगोळी काढण्यासाठी आपल्याला एक खोलगट ताट किंवा तबक लागणार आहे. त्या ताटाचा किंवा तबकाचा बेस मात्र सपाट असावा. 

पाडवा- भाऊबीजेसाठी सुंदर ड्रेस घ्यायचा? बघा स्वस्तात मस्त आकर्षक भरजरी ड्रेसचे ३ पर्याय

आता सगळ्यात आधी त्या ताटाच्या बेसला तेल लावून घ्या. तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा व्हॅसलिनचा वापरही करू शकता. 

आता तेल, तूप किंवा व्हॅसलिन लावल्यानंतर ५ मिनिटांनी त्या ताटावर तुम्हाला पाहिजे ते रांगोळीचं डिझाईन काढा. त्यात रंग भरा.

 

त्यानंतर २ ते ३ मिनिटे ती रांगोळी जरा सेट होऊ द्या. त्यानंतर ताटाच्या एका बाजुने अलगदपणे पाणी सोडा. पाण्याची धार आपण काढलेल्या रांगोळीवर येणार नाही, याची मात्र काळजी घ्या.

"काटूँ कैसे रातां ओ सावरे...", म्हणत विमानतळावरच केला डान्स, बॉयफ्रेंडचं केलं भन्नाट स्वागत- व्हिडिओ व्हायरल

झाली तुमची ताटावर काढलेली पाण्याखालची रांगोळी तयार.. तिला आणखी सजविण्यासाठी तुम्ही ताटाच्या कडेने फुलंही लावू शकता. मधोमध पाण्यावर तरंगणारा दिवा ठेवून तिला आणखी सुशोभितही करू शकता.

टिपॉयवर ठेवायला किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात सजवून ठेवायला ही रांगोळी छान आहे. किंवा दाराबाहेर तुम्ही हे तबक मध्यभागी ठेवून त्याभोवती आणखी रांगोळी काढून ते सजवू शकता. 

 

टॅग्स :दिवाळी 2023रांगोळी