सर्वच भारतीय घरांमध्ये भांडी ठेवण्यासाठी स्टेनलेस स्टिलचा रॅक म्हणजेच मांडणीचा वापर केला जातो. (Diwali House Cleaning Tips) भिंतीवर मांडणीचा स्टँण्ड लावला जातो. (Home Clening in Diwali) रोज चिकट, खराब हात लागल्याने किंवा धूळ साचल्याने मांडणी खराब होते. ओल्या कापडाने पुसल्यानंतर तात्पुरती मांडणी चांगली दिसते नंतर पुन्हा मांडणीवर डाग दिसू लागतात. (How to clean utensils stand)
कोणताही पदार्थ शिजताना त्यातून निघणाऱ्या धुरामुळे मांडणीवर आणि टाईल्सवरही चिकट थर तयार होतो. मॉड्यूलर किचनमुळे हा त्रास काही प्रमाणात कमी होऊ लागला आहे. (Cleaning House for Diwali) तुमच्याही घरात स्टिलची मांडणी असेल तर हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही काही सोप्या क्लिनिंग टिप्स वापरू शकता. (Easy Tips To Clean Utensils Stand)
व्हिनेगरचा वापर करा
भांड्यांच्या मांडणीचा चिकटपणा घालवण्यासाठी १ चमचा व्हिनेगर आणि २ चमचे पाण्यात एक कापड भिजवून मांडणी व्यवस्थित पुसून घ्या किंवा आधी पूर्ण मांडणीला हे मिश्रण लावून नंतर स्टॅण्डला हलकं गरम पाणी लावून सुक्या कापडाने व्यवस्थित पुसून घ्या.
बेकींग सोडा
सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये बेकींग सोडा आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा. नंतर स्टँण्डवर लावून २० मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. नंतर डिशवॉशने स्वच्छ करा. शेवटी स्टँण्ड कोमट पाण्याने स्वच्छ करा.
कॅल्शियमने खच्चून भरलेत स्वस्तात मिळणारे ५ पदार्थ; नियमित खा- २०६ हाडं होतील बळकट
मीठ आणि चुना
मीठ, चुना आणि बोरेक्स पावडर स्टॅण्डवर लागलेला गंज काढून टाकण्याचा एक उत्तम उपाय आहे. याचा वापर केल्याने हट्टी डाग निघण्यास मदत होते. तेलकट डाग निघून जातात. सगळ्यात आधी १ कप पाण्यात बोरेक्स पावडर, मीठ आणि चुना घालून व्यवस्थित मिसळा. नंतर हे मिश्रण गंज किंवा डाग असलेल्या ठिकाणी लावा आणि ५ मिनिटांसाठी तसेच सोडून द्या. ५ मिनिटांनी ब्रशने रगडून मांडणी स्वच्छ करा.
धूळ साचून पंखा काळा झालाय? ४ ट्रिक्स, स्टूलवर न चढता-हात लावता १ मिनिटांत चमकेल फॅन
मांडणीवर गंज लागल्यास कसा स्वच्छ करावा? (How do you remove rust from utensil stands)
भांड्याच्या स्टॅण्डवर ओले हात किंवा ताटांचे पाणी पडल्यामुळे जंग लागतो. कोणत्याही ठिकाणी गंज लागला तर ते काढणं कठीण होतं. गंज काढून टाकण्यासाठी तुम्ही एका भांड्यात २ ग्लास गरम पाणी घालून त्यात २ मोठे चमचे अमोनिया पावडर मिक्स करा. हे मिश्रण कोमट झाल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून मांडणीवर स्प्रे करा. नंतर १० मिनिटं हे मिश्रण स्टॅण्डवर लावलेले राहू द्या. नंतर जुन्या टूथब्रशने किंवा स्क्रबरच्या मदतीने रगडून स्वच्छ करा.