Join us  

Diwali : ठिपक्यांची-फुलापानांची किचकट रांगोळी विसरा, ५ मिनिटांत काढा सुंदर झटपट मोठ्ठी रांगोळी-पाहा सोपी ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2024 1:42 PM

Diwali special easy rangoli designs : घराच्या बाहेरची जागा, उपलब्ध रंग यांचा अंदाज घेऊन अगदी झटपट काढता येईल अशी रांगोळी..

दिवाळीच्या दिवसांत आपण घराची, घराच्या आजुबाजूची साफसफाई करतो आणि विशेष म्हणजे सजावटही करतो. दिव्यांचा हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यासाठी आपण हे सगळं करत असतो. दारात दिवे लावणे, आकाशकंदील, लायटींगच्या माळा लावणे याबरोबरच आणखी एक गोष्ट आवर्जून केली जाते ती म्हणजे रांगोळी. एरवी तर आपण दारात रांगोळी काढतोच पण दिवाळीच्या दिवसांत आवर्जून रांगोळी काढली जाते (Diwali special easy rangoli designs). 

रांगोळी म्हटलं की आपल्याला ठिपक्यांची, फुलांची, पाण्यावरची किंवा अगदी मोर नाहीतर पणतीची अशा बऱ्याच डिझाईन्स आठवतात. हल्ली बाजारात रांगोळी काढण्यासाठी बरीच साधनेही मिळतात. पण फराळ, पाहुणे, साफसफाई घरातील सगळ्यांचे सगळे करता करता रांगोळीसाठी आपल्याकडे पुरेसा वेळ असतोच असे नाही. अशावेळी झटपट तरीही सुंदर रांगोळी कशी काढायची याची १ सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत. यामुळे वेळ तर वाचेलच पण आपला दरवाजाही छान सजण्यास मदत होईल. पाहूया ही ट्रिक कोणती...

(Image : Google)

१. सगळ्यात आधी भिंतीच्या बाजुला रंग चाळून एकसारखे पसरवायचे. यामध्ये आपण आपल्या आवडीचे कोणतेही २ रंग घेऊ शकतो. 

२. त्यानंतर बोटाने या रंगात आपल्याला आवडेल तसा आकार काढायचा. यामध्ये गोपद्म, चक्र, पान, फूल असे काहीही काढता येऊ शकते. 

३. नंतर साधे बिंदू देऊन याच्या खाली थोडीशी डिझाईन काढायची. या डिझाईनमध्ये व्हेरीएशन करण्यासाठी कॉटन बड्स, कंगवा यांचा वापर करु शकतो. 

४. रंगसंगती आणि डिझाईन आपल्याला सुचेल, आवडेल तशी काढायची. आपल्या दारात किती जागा आहे त्याचा अंदाज घेऊन ही रांगोळी काढायला हवी.  

५. या रांगोळीला आपण पणत्या, फुलं, एखादी लेस असं जे उपलब्ध असेल अशा कोणत्याही गोष्टीने सजवू शकतो.   

टॅग्स :सोशल व्हायरलगृह सजावटरांगोळीदिवाळी 2024दिवाळीतील पूजा विधी