Lokmat Sakhi >Social Viral > दिवाळीसाठी झटपट वाती करण्याच्या ३ ट्रिक्स, किचकट काम करा फक्त १० मिनिटांत आणि वातीही होतील सुंदर...

दिवाळीसाठी झटपट वाती करण्याच्या ३ ट्रिक्स, किचकट काम करा फक्त १० मिनिटांत आणि वातीही होतील सुंदर...

Diwali Special How to make Batti for Diya : Diwali special how to make batti for diya how to make cotton batti in less time : In 2 Sec How to make Cotton Wicks at Home : वाती बनवण्याच्या या ३ ट्रिक्स तुमचं काम अधिकच सोपं करू शकतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 06:08 PM2024-10-23T18:08:33+5:302024-10-23T18:25:43+5:30

Diwali Special How to make Batti for Diya : Diwali special how to make batti for diya how to make cotton batti in less time : In 2 Sec How to make Cotton Wicks at Home : वाती बनवण्याच्या या ३ ट्रिक्स तुमचं काम अधिकच सोपं करू शकतात...

Diwali Special How to make Batti for Diya Diwali special how to make batti for diya how to make cotton batti in less time | दिवाळीसाठी झटपट वाती करण्याच्या ३ ट्रिक्स, किचकट काम करा फक्त १० मिनिटांत आणि वातीही होतील सुंदर...

दिवाळीसाठी झटपट वाती करण्याच्या ३ ट्रिक्स, किचकट काम करा फक्त १० मिनिटांत आणि वातीही होतील सुंदर...

दिवाळी (Diwali 2024) म्हणजे खास रोषणाईचा सण. दिवाळीत सगळीकडे दिव्यांचा लक्ख प्रकाश लाईटचा झगमगाट पाहायला मिळतो. दिवाळी हा सण दिव्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. सगळ्यांच्याच घरी - दारोदारी आकर्षक दिवे, कंदील लावलेले असतात. दिवाळीत आपण रांगोळी आणि दिव्यांची आरास करुन घर, अंगण सजवतो. दिवाळीत दिव्यांच्या सजावटीला फार महत्व असते(In 2 Sec How to make Cotton Wicks at Home).

आपण दारासमोर रांगोळी काढून त्याभोवती दिवे लावतो तसेच घरच्या खिडक्या, अंगण घराभोवतीच्या परिसरात वेगवेगळ्या डिझाईन्सचे दिवे लावून आपण दिवाळी साजरी करतो. दिवाळीच्या दिवसांत इतक्या दिव्यांची आरास करण्यासाठी या दिव्यात लागणाऱ्या वाती देखील फार मोठ्या प्रमाणावर तयार कराव्या लागतात. अशा परिस्थितीत, इतक्या वाती वळत बसायला पुरेसा वेळ नसतो. अशावेळी आपण अगदी कमी वेळात झटपट वाती कशी तयार करुन ठेवता येतील त्याची एक साधीसोपी ट्रिक (Diwali Special How to make Batti for Diya) पाहणार आहोत. या ट्रिक्सचा वापर करुन आपण अगदी कमी वेळात जास्तीत जास्त वाती तयार करु शकता. वाती  बनवण्याच्या ट्रिक्स तुमचं काम अधिक सोपं करू शकता(Diwali special how to make batti for diya how to make cotton batti in less time).

१. लांब वाती बनवण्याच्या ट्रिक्स... 

झटपट वाती वळण्यासाठी आपण एखादी टूथपिक किंवा लांब अशा लाकडी स्टिकचा वापर करु शकता. सर्वातआधी वाती वळण्यासाठी कापूस थोडा मोकळा करुन घ्यावा. कापूस मोकळा करुन घेतल्यानंतर थोडा कापूस घेऊन तो थोडा पसरवून मोकळा करून ठेवावा. त्यानंतर या कापसावर टूथपिक किंवा लांब अशा लाकडी स्टिक ठेवून ती स्टिक हाताच्या पंजाने वाती वळतो तसे वळून घ्यावे. वाती वळताना दुधाचे २ ते ३ थेंब या कापसावर घालून मग वाती वळून घ्याव्यात यामुळे वाती झटपट वळून होण्यास मदत मिळते. याचबरोबर दुधामुळे वाती लगेच न विझता दीर्घकाळ तेवत राहतात. टूथपिक किंवा लाकडी स्टिकच्या वापराने वातींना पटकन आकार देण्यास मदत होते, यामुळे तासंतास वाती वळण्याची गरज भासत नाही आणि कमी वेळात वाती पटकन वळून होतात.   

ना भाजणीची धावपळ, ना तेलात चकली विरघळण्याचं टेंशन, १० मिनिटांत करा इन्स्टंट बटर चकली...


२. गोल वाती (फुलवात) बनवण्याच्या ट्रिक्स...

थोडासा कापूस घेऊन त्याच्या फुलवाती तयार करून घ्या, आता एका कढईत मेणबत्तीचे काही तुकडे घेऊन ते वितळवून घ्यावेत. त्यानंतर त्यात थोडेसे तूप आणि कापूरच्या ३ ते ४ वड्या घालाव्यात. हे सगळे मिश्रण व्यवस्थित विरघळवून घ्यावेत. आता एका बर्फाच्या ट्रे मध्ये एक एक फुलवात ठेवून त्यात हे वितळवून घेतलेले मिश्रण ओतून घ्यावे. त्यानंतर ते व्यवस्थित सुकवून घ्या. थोड्या वेळाने या वाती ट्रे मधून काढून घेऊन एका डब्यांत स्टोअर करून ठेवाव्यात. आपण दिव्यात या वाती ठेवून लगेच दिवे पेटवू शकतो. यासोबतच अशा प्रकारच्या वाती वापरल्याने दिव्यातून तेल सांडण्याचा प्रश्नच येत नाही.

कोण म्हणते अनारसा करणे कठीण काम? ही घ्या झटपट अनारसे करण्याची कृती, खा जाळीदार अनारसे...


३. तुपाच्या वाती कशा कराव्यात... 

तुपाच्या वाती करण्यासाठी सगळ्यात आधी साजूक  तूप एका भांड्यात काढून वितळवून घ्या.  तूप वितळवून थोडं थंड केल्यानंतर वातींवर घाला. वाती तुपात भिजवल्यानंतर साच्यात घाला. नंतर पुन्हा त्यावर तूप घाला. या वाती फ्रिजमध्ये १० ते १५ मिनिटांसाठी ठेवून द्या. नंतर हा साचा बाहेर काढून वाती बाहेर काढा. एका पॉलिथिनमध्ये बॅगमध्ये ठेवून फ्रिजमध्ये किंवा बाहेरही ठेवू शकता.  

फ्रोझन करुन ठेवा आणि कधीही खा ‘या’ ६ भाज्या, आज भाजीला काय करु, प्रश्नही सुटेल!


अशाप्रकारे आपण वरील तीन सोप्या ट्रिक्स वापरुन अगदी कमी वेळात झटपट वाती वळून ठेवू शकता.

Web Title: Diwali Special How to make Batti for Diya Diwali special how to make batti for diya how to make cotton batti in less time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.