दिवाळी (Diwali) हा असा सण आहे ज्याला दिपोत्सव असेही म्हटले जाते. दिवाळीच्या दिवसांत घराघरांत दिवे लावले जातात. अनेकजण घरी दिवे लावतात तर काहीजण बाजारातून दिवे विकत आणतात. दिवा लावायचं म्हणलं की वाती बनवणं फार महत्वाचे असते. बिना वातीचा दिवा लावणं शक्यच नसते. बाजारातील दिव्यांच्या किमती फारच जास्त असतात. (How to Make Cotton Batti)
वाती बनवण्याच्या ट्रिक्स तुमचं काम अधिक सोपं करू शकता. कमीत कमी वेळात तुम्ही भरपूर वाती बनवू शकता. या ट्रिकने तुम्ही फूल वाती किंवा लांब वाती कोणत्याही बनवू शकता. दिवाळीत दिवे लावल्यानं घरात सकारात्मक वातारवरण राहते. आयुष्यातील अंधारमय वातावरण दूर करून शांतता, सुख, समृद्धी येण्याासाठी दिवे लावले जातात. (Diwali Special How to make Batti for Diya)
लांब वाती बनवण्याच्या ट्रिक्स
लांब वाती बनवण्यासाठी एक पाट घाली ठेवा किंवा भिंतीला उभा करा. त्यानंतर तुम्हाला हवा असेल तर तितका कापूस वेगळा काढून पाटावर ठेवा आणि हाताने वर खाली करा. कापसाने लांबट आकार घेतल्यानंतर हाताने चपटे करून वातीप्रमाणे व्यवस्थित आकार द्या वरचे आणि खालचे टोक पूर्णपणे बंद करून घ्या.
गोल वाती (फुलवात) बनवण्याच्या ट्रिक्स
गोल वाती बनवण्यासाठी सगळ्यात आधी कापूस घ्या आणि एका वाटीत दूधही काढून घ्या. थोडा कापूस घेऊन गोलाकार लपेटून दुधाचा हात लावून वातीचे टोक बंद करा. नंतर बोटांच्या मदतीने फुलवातीचा आकार द्या. दुधामुळे वातीचे टोक घट्ट बंद होण्यास मदत होते. (How to Make Diya Batti)
तुपाच्या वाती कशा कराव्यात (How to make ghee diya Batti)
तुपाच्या वाती करण्यासाठी सगळ्यात आधी साजूक तूप एका भांड्यात काढून वितळवून घ्या. तूप वितळवून थोडं थंड केल्यानंतर वातींवर घाला. वाती तुपात भिजवल्यानंतर साच्यात घाला. नंतर पुन्हा त्यावर तूप घाला. या वाती फ्रिजमध्ये १० ते १५ मिनिटांसाठी ठेवून द्या. नंतर हा साचा बाहेर काढून वाती बाहेर काढा. एका पॉलिथिनमध्ये बॅगमध्ये ठेवून फ्रिजमध्ये किंवा बाहेरही ठेवू शकता.