Join us  

दिवाळीची साफसफाई करायची, खिडक्या पुसायच्या म्हणून बाई पाहा कुठं पोहचल्या.. व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 11:41 AM

What a Stunt By Woman: बघा या बाईंची कमाल, घराच्या खिडक्या स्वच्छ करायच्या म्हणून हे असं करतं का कुणी?

ठळक मुद्देजीव धोक्यात घालून घराची स्वच्छता करण्यात दंग असलेल्या या बाई गाझियाबाद येथे राहणाऱ्या असून त्यांचा हा स्टंट अगदी बघायला हवा असाच आहे.

दिवाळी जवळ आली रे आली की अनेक महिलांच्या आनंदाला, उत्साहाला उधाण येतं. यात सगळ्यात पहिली लाट येते ती स्वच्छता मोहिमेची (woman cleaning her home for diwali). वर्षभर घरात साचलेला सगळा कचरा यानिमित्ताने बाहेर निघतो, दारं- खिडक्या, भिंती धुवून- पुसून लख्ख केल्या जातात. बायको किंवा आईचा उत्साह बघून किंवा मग त्यांच्या धाकापायी घरातल्या बाकीच्या सदस्यांनाही नाईलाजाने या अभियानात सहभागी व्हावं लागतं. आता घर स्वच्छ करायचं म्हणजे उंच टेबलावर, स्टूलवर चढणं साहजिक आहे. पण इथे या बाईंनी स्वच्छतेच्या नावाखाली जी काही कमाल केली आहे, ते पाहून मात्र नेटिझन्सचे अक्षरश: डोळेच फिरले आहेत (viral video).

 

दिवाळीनिमित्त घराची साफसफाई करणाऱ्या या बाईंचा फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

स्क्रब, फेशियलला वेळ नाही? दिवाळीत मेकअप करण्याआधी फक्त हा होममेड स्क्रब लावा, त्वचा होईल सुंदर

हिंदुस्थान टाईम्सच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अवघ्या काही तासांमध्येच जवळपास ७ लाख लाईक्स मिळाले आहे. जीव धोक्यात घालून घराची स्वच्छता करण्यात दंग असलेल्या या बाई गाझियाबाद येथे राहणाऱ्या असून त्यांचा हा स्टंट अगदी बघायला हवा असाच आहे.

 

या व्हिडिओमध्ये एक इमारत दिसते आहे. त्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेचा हा अनोखा प्रयोग सुरू आहे. खिडकीची आतली बाजू आपण पुसू शकतो. पण बाहेरची बाजू पुसायची असेल तर जे लोक वरच्या मजल्यावर राहतात आणि ज्यांना खिडकीच्या बाहेर बाल्कनी नसते, त्यांच्यासाठी ते अवघड हाेतं.

दिवाळीत खाणं खूप झाल्यानं अपचनाचा त्रास- ॲसिडिटी वाढली, तर हा घ्या इन्स्टंट काढा- हाताशी ठेवा रेसिपी

या बाईंचंही तसंच आहे. म्हणून त्या चक्क खिडकीवर बाहेरील बाजूने चढल्या आणि खिडक्या पुसू लागल्या. आणखी आश्चर्य म्हणजे त्या या सगळ्या गोष्टी खूपच सहजतेने करत आहेत. त्या चौथ्या मजल्यावर असून, कुठल्याही क्षणी थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तरी काहीही होऊ शकतं, हे त्यांच्या गावीही नसावं असंच त्यांच्याकडे पाहून वाटतं. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सदिवाळी 2022