फ्रिज हा आपल्या घरातील महत्वाच्या वस्तूंपैकी एक आहे. फ्रिजमध्ये आपण अनेक गोष्टी ठेवतो. अन्नपदार्थ खराब होऊ नये, यासाठी आपण फ्रिजचा वापर करतो. उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत फ्रिजचा वापर होतो. पण फ्रिज साफ करणे हा मोठा टास्क मानला जातो. फ्रिजच्या कानाकोपऱ्याची सफाई करताना नाकीनऊ येतात.
मुख्य म्हणजे फ्रिजची सफाई करताना अनेकदा आपण रबर साफ करण्यास विसरून जातो. ज्यामुळे फ्रिज अधिक कळकट - खराब दिसतो. फ्रिजचा रबर लवकर साफ न केल्यास, फ्रिजचा दरवाजा व्यवस्थितरित्या बंद होत नाही. त्यामुळे कुलिंग कमी होते, व कालांतराने फ्रिज खराब होतो. फ्रिजचे रबर साफ करणे खूप कठीण जाते, यासाठी काही टिप्स फॉलो करा. कमी वेळात झटपट फ्रिज साफ होईल(DIY Fridge Gasket Cleaning Tips).
व्हिनेगर
एका भांड्यात पाणी घ्या, त्यात व्हिनेगरचे ४ ते ५ थेंब घालून मिक्स करा. पाण्यात व्हिनेगर मिक्स केल्यानंतर, हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा. त्यानंतर रबरावर फवारणी करा, व रबर कापडाने स्वच्छ करा. अशा प्रकारे फ्रिजच्या दाराच्या रबरावर साचलेली घाण व्यवस्थित साफ होईल.
पोलिओग्रस्त आईच्या उपचारांसाठी छोटेसे बहीण-भाऊ आइस्क्रीम विकायला रस्त्यावर उतरले..
कोमट पाणी
कोमट पाण्याने देखील फ्रिजच्या रबरवर साचलेली घाण निघून जाईल. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात सुती कापड भिजवून घ्या, व कापडाने रबर स्वच्छ करा, या ट्रिकमुळे नक्कीच रबर स्वच्छ होईल.
टूथपेस्ट
घरात जर जुना टूथब्रश पडला असेल तर, आपण त्याचा वापर फ्रिजचे रबर साफ करण्यासाठी करू शकता. यासाठी टूथब्रशवर थोडी टूथपेस्ट लावा, व त्यानंतर ब्रशने रबर घासा. रबर स्वच्छ घासल्यानंतर रबरावरील अतिरिक्त टूथपेस्ट कापडाने स्वच्छ करा.
चमचे-काटे गंजलेत? ते फेकू नका, २ उपाय-गंजही निघेल-चमचे चकाकतील
स्पंज
स्पंजच्या मदतीने आपण फ्रिजच्या दाराचे रबर सहज साफ करू शकता. यासाठी १ कप पाण्यात थोडेसे डिटर्जंट मिसळा, व या मिश्रणात स्पंज बुडवून रबर साफ करा. रबर व्यतिरिक्त आपण फ्रिजची आतील बाजूही स्वच्छ करू शकता. त्यानंतर एका सुती कापडाने फ्रिज स्वच्छ पुसून काढा.
बेकिंग सोडा
आपण फ्रिजचा रबर साफ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी एक कप पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळून लिक्विड तयार करा. यानंतर स्वच्छ कापड त्या मिश्रणात भिजवून त्याने रबर स्वच्छ करा.