आपल्या काही काही चपला अशा असतात की त्या आपण मागच्या २- ३ वर्षांपासून वापरत असतो. पण तरीही त्या चपलांना (old and broken slippers) काहीही होत नाही. शेवटी आपल्याला तिची ती चप्पल वापरून कंटाळा यायला लागतो. अशी जुनी झालेली चप्पल जर एका बदललेल्या फॅशनेबल (how to convert your old slippers into fashionable chappals) रुपात आपल्या समोर आली तर? पुन्हा एकदा एक नवी चप्पल वापरण्याचा आनंद नक्कीच मिळतो. म्हणूनच तर अशा जुन्या झालेल्या आणि स्लिपर प्रकारात असणाऱ्या चपलांना एक नवा स्टायलिश लूक (stylish look to old slippers) कसा द्यायचा त्याविषयी या काही टिप्स..
जुन्या चपलांना असा द्या फॅशनेबल लूक....१. जुन्या झालेल्या स्लिपरपासून छान स्टायलिश चप्पल कशी तयार करायची, याविषयीचा एक मस्त व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या soniasgautam या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं दाखवलं आहे की, सगळ्यात आधी तर स्लिपरचा जो बेल्ट अंगठ्याच्या बाजुला येतो, तो बेल्ट एका बाजूने अगदी लगेचच तर दुसऱ्या बाजूने थोडं अंतर ठेवून कापा. आता कापलेले दोन भाग एकमेकांना गोलाकार भागात चिकटवा आणि त्यावर अंगठ्याच्या बाजूला येताे तो बेल्ट जोडा. आता हे दोन्ही चिकटवलेले बेल्ट झाकून टाकण्यासाठी बाजारात मिळणारे लटकन किंवा वेगवेगळ्या लेस वापरा. छान नव्या रुपातली स्लिपर झाली तयार.
२. स्लिपरचा बेल्ट तुटला असेल तर ती मुळीच टाकून देऊ नका. तुमच्या घरातल्या एखाद्या साध्या पण चपलेला मिळत्या- जुळत्या कापडाचा वापर करून नविन डिझाईनची स्लिपर तयार करा. यासाठी स्लिपरचे तुटके बेल्ट काढून टाका. आता तुमच्या स्लिपरला वरच्या बाजूने एक आणि खालच्या बाजूने २ अशी छिद्रे असतील. आता एक कापड घ्या. कापडाची रुंदी साधारण ३ ते ४ सेमी असावी. आता ते कापड मधोमध दुमडा. त्याचा मधला भाग वरच्या छिद्रातून आत घाला आणि स्लिपरच्या खालच्या बाजूने त्याची गाठ मारा. आता कापडाचे दोन्ही भाग डावीकडच्या आणि उजवीकडच्या छिद्रात घाला आणि खालच्या बाजूने गाठी मारा. गाठी मारून उरलेले कापड कापून टाका. अशाप्रकारे जुन्याच स्लिपरला नवा बेल्ट लावून नवा लूक देता येईल.
३. तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण स्ट्रेचेबल कपड्याचा वापर करणार आहोत. यासाठी आधी स्लिपरचे तुटके बेल्ट काढून टाका. आता साधारण आपल्या हाताच्या बोटाएवढ्या आकाराचे आणि मापाचे स्ट्रेचेबल कपड्याचे २ तुकडे घ्या. ते दोन्ही तुकडे स्लिपरच्या खालच्या बाजूने असणाऱ्या एकेका छिद्रात टाका आणि चपलेल्या खालच्या बाजूने त्याची गाठ मारून घ्या. आता त्याच कपड्याचा एक मोठा लांबलचक तुकडा स्लिपरच्या वरच्या टोकातून आत घाला. खालच्या बाजूने त्याची गाठ मारा. हा वरचा तुकडा गोल- गोल करत त्याला पिळ द्या किंवा मग त्याची वेणी घाला. ही वेणी आणि खालच्या बाजूने असणाऱ्या डावीकडच्या व नंतर उजवीकडच्या छिद्रातून घालत पुन्हा वरच्या छिद्रात टाका आणि स्लिपरच्या बाहेरच्या बाजूने त्याची गाठ मारा. छान स्टायलिश चप्पल तयार.