Lokmat Sakhi >Social Viral > फक्त ३ पदार्थ वापरून घरीच तयार करा होळीचे रंग- बघा ऑर्गेनिक रंग बनविण्याची सोपी पद्धत

फक्त ३ पदार्थ वापरून घरीच तयार करा होळीचे रंग- बघा ऑर्गेनिक रंग बनविण्याची सोपी पद्धत

How To Make Organic, Natural Holi Colours At Home: रंगपंचमी किंवा होळीसाठी घरगुती पदार्थ वापरून नैसर्गिक पद्धतीने ऑर्गेनिक किंवा इकोफ्रेंडली रंग कसे तयार करायचे ते बघुया...(Holi Celebration 2024)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2024 05:12 PM2024-03-18T17:12:10+5:302024-03-18T17:12:54+5:30

How To Make Organic, Natural Holi Colours At Home: रंगपंचमी किंवा होळीसाठी घरगुती पदार्थ वापरून नैसर्गिक पद्धतीने ऑर्गेनिक किंवा इकोफ्रेंडली रंग कसे तयार करायचे ते बघुया...(Holi Celebration 2024)

DIY: How to make organic, ecofriendly natural holi colours at home, easy and simple method of making holi colours at home | फक्त ३ पदार्थ वापरून घरीच तयार करा होळीचे रंग- बघा ऑर्गेनिक रंग बनविण्याची सोपी पद्धत

फक्त ३ पदार्थ वापरून घरीच तयार करा होळीचे रंग- बघा ऑर्गेनिक रंग बनविण्याची सोपी पद्धत

Highlightsघरगुती साहित्य वापरून रंग तयार करणं अतिशय सोपं आहे. ते कसे तयार करायचे ते आता पाहूया...

होळी, धुलीवंदन किंवा रंगपंचमीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे शहरांमधल्या बाजारपेठा आता होळीचे रंग, रंगपंचमी या साहित्याने सजायला सुरुवात झाली आहे. पण विकत मिळणारे रंग केमिकलयुक्त असतात. असे रंग लावल्याने त्वचेचं खूप नुकसान होतं. शिवाय ते पर्यावरणासाठीही हानिकारक आहेत. त्यामुळे असे रंग टाळलेले बरे. याला उत्तम पर्याय म्हणजे घरगुती पदार्थ वापरून तयार करण्यात आलेले रंग (How To Make Organic, Natural Holi Colours At Home). घरगुती साहित्य वापरून रंग तयार करणं अतिशय सोपं आहे. ते कसे तयार करायचे ते आता पाहूया... (easy and simple method of making holi colours at home)

होळीसाठी घरी रंग कसे तयार करावे?

 

होळीसाठी घरी वेगवेगळे रंग तयार करायचे असतील तर आपल्याला २ पदार्थ लागणार आहेत. ते म्हणजे काॅर्न फ्लाॅवर आणि टाल्कम पावडर. या दोन पदार्थांचा बेस वापरून आपण वेगवेगळे रंग तयार करू शकतो. 

'आता ए साला कप नामदू' म्हणत स्मृती मंधाना जिंकली मनं; जे पुरुष संघालाही जमलं नाही..

यासाठी सगळ्यात आधी १ वाटी कॉर्न फ्लॉवर घ्यावे. त्यामध्ये १ चमचा टाल्कम पावडर टाकावी. हे दोन्ही पदार्थ चांगले एकत्र करून घ्यावेत. 

जर पिवळा रंग तयार करायचा असेल तर त्यासाठी एका वाटीत हळद घ्या आणि तिच्यामध्ये पाणी टाकून कालवून घ्या. आता हे हळदीचं पाणी कॉर्नफ्लॉवर आणि टाल्कम पावडरच्या मिश्रणामध्ये टाका आणि कालवून घ्या.

 

ही पिवळ्या रंगाची वाटी आता उन्हामध्ये एखादा दिवस ठेवून द्या. त्यानंतर रंग कोरडा झाला की तो मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदा फिरवून घ्या. असे केल्याने त्या रंगातल्या गाठी निघून जातात आणि छान कोरडा पावडरसारखा बारीक रंग तयार होतो. अशाच पद्धतीने वेगवेगळे रंग तयार करता येतात.

हॉलमध्ये 'कॉर्नर पीस' म्हणून ठेवता येण्यासारखी ५ सुंदर रोपं

कोणता रंग तयार करण्यासाठी काय वापरायचं ते पाहूया. हिरवा रंग तयार करायचा असेल तर पालक मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस काढून घ्या. लाल रंग तयार करण्यासाठी कुंकवाचं पाणी वापरा. गुलाबी रंग तयार करण्यासाठी बीटरुट वापरा. त्यात गुलाब पाणीही घाला. यामुळे गुलाबी रंगाला छान गुलाबाचा सुवास येईल. निळा- जांभळा रंग तयार करण्यासाठी खाण्याचा निळा- जांभळा रंग वापरा. 

 


 

Web Title: DIY: How to make organic, ecofriendly natural holi colours at home, easy and simple method of making holi colours at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.