Join us  

वापरून झालेले व्हॅक्स कॅण्डल फेकून देऊ नका... घर सजविण्यासाठी त्याचा 'असा' मस्त उपयोग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2023 12:39 PM

How To Reuse Wax Candle Holder or Tea Candle Holder: वापरून झालेले व्हॅक्स कॅण्डल पुन्हा एकदा खूप छान पद्धतीने उपयोगात आणता येतात. ते नेमके कसे ते आता पाहूया....

ठळक मुद्देव्हॅक्स कॅण्डल्सच्या होल्डरचा  खूप छान उपयोग घराच्या सजावटीसाठी करता येतो.

दिवाळीला मोठ्या हौशीने आपण वेगवेगळ्या आकाराचे दिवे, पणत्या आणत असतो. मातीच्या पणत्या दिवाळीनंतर पुन्हा स्वच्छ करून वापरता येतात. चांगला वापर केला तर अगदी वर्षानुवर्षे त्या टिकतात. हल्ली रांगोळीत ठेवायला किंवा डेकोरेटीव्ह कामासाठी व्हॅक्स कॅण्डल अनेक जण आणतात. एकदा आणलेले हे कॅण्डल २ ते ३ तास चालतात आणि त्यानंतर त्यातलं मेण संपल्यामुळे विझून जातात. बऱ्याचदा आता त्याचा काय उपयोग म्हणून आपण ते फेकून देतो. पण असं करू नका. कारण या व्हॅक्स कॅण्डल्सच्या होल्डरचा  खूप छान उपयोग घराच्या सजावटीसाठी करता येतो. फक्त दिवाळीतच नाही, तर नंतर वर्षभर तुम्ही ते वेगवेगळ्या कामांसाठी वापरू शकता. (Best reuse of wax candle holder or tea candle holder)

 

वापरून झालेल्या व्हॅक्स कॅण्डलचा पुन्हा कसा वापर करायचा?

१. हा उपाय इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

२. सगळ्यात आधी व्हॅक्स कॅण्डल होल्डरमध्ये जे मेण अडकलेले आहे ते काढून टाका. तो दिवा धुवून पुसून स्वच्छ करून घ्या.

दिवाळीत सुंदर पारंपरिक हेअरस्टाइल करायची तर अंबाडा घालण्याचे बघा ७ ट्रेण्डी आणि सोपे प्रकार

३. व्हॅक्स कॅण्डल होल्डर तयार करण्यासाठी जो धातू वापरलेला असतो, तो अतिशय हलका असतो. त्यामुळे तुम्ही त्याला वाकवून हवा तसा आकार देऊ शकता.

४. त्यानुसार कॅण्डल होल्डर बाजूंनी पसरवा आणि त्याच्या दोन्ही दुसऱ्या दोन्ही बाजू आतल्या बाजूने मुडपून व्यवस्थित ठोकून घ्या. एखाद्या फुलाच्या पाकळीसारखा किंवा पानासारखा आकार त्याला द्या.

 

५. आता एक पुठ्ठा गोलाकार किंवा चौकोनी आकारात कापा आणि त्याच्यावर हे आकार कमळाच्या पाकळ्या असतात, त्याप्रमाणे एकेक करून रचून चिटकवून घ्या.

जुही परमार सांगतेय चेहऱ्याला इंस्टंट ग्लो मिळवून देणारा खास उपाय- ५ मिनिटांत चेहरा चमकेल

६. त्याच्या मधोमध दिवा ठेवण्यासाठी किंवा मेणबत्ती लावण्यासाठी जागा ठेवा.

७. या तयार केलेल्या शो पीसला सोनेरी, चंदेरी असे चमकदार रंग द्या... ही सुंदर वस्तू तुम्हाला बघा कशी वर्षानुवर्षे वापरता येईल...  

टॅग्स :दिवाळी 2023सोशल व्हायरल