Join us  

महिलेनं सहज डीएनए टेस्ट केली, आणि रिपोर्ट पाहून तिला धक्काच बसला, कारण....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2022 11:19 AM

DNA Test Result Revealed Secret of American Women Shocking : प्रकरणाचा छडा लावल्यावर समजली इतके वर्ष लपवलेली खरी गोष्ट.

ठळक मुद्देमहिलेने या गोष्टीचा छडा लावायच ठरवला आणि आपले नेमके वडील कोण याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. एकूण १८ महिला सापडल्या ज्या तिच्या सावत्र बहिणी होत्या. त्यानंतर नेमका प्रकार सर्वांच्याच लक्षात आला.

आपल्या वंशाबद्दल किंवा अनुवंशिक काही गोष्टींबाबत जाणून घ्यायचे असेल तर आपण डीएनए चाचणी करतो. आपली गुणसूत्रे आपल्या आईवडिलांशी जुळणारी असतात. ही चाचणी काही विशिष्ट आजार किंवा काही कायदेशीर बाबी असतील तरच प्रामुख्याने केली जाते. अनेकदा मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठीही डीएनए चाचणी करण्याची पद्धत आहे. मात्र विनाकारण कोणी ही चाचणी करत नाही. पण एका अमेरिकन महिलेने सहज कुतूहल म्हणून आपली डीएनए चाचणी केली. या चाचणीतून जी माहिती समोर आली त्यामुळे या महिलेला चांगलाच धक्का बसला (DNA Test Result Revealed Secret of American Women Shocking). 

(Image : Google)

द सन वेबसाइटच्या वृत्तानुसार, ४१ वर्षीय माइया इमॉन्स बोरींग ही टेक्सासमधील सॅन अँटोनिया येथे राहणारी महिला आहे. माइया गृहिणी असून तिच्या ४२ वर्षाय ब्रेंटसोबत राहते. ब्रेंट ट्रक ड्रायव्हर असून या दोघांना लारीसा ही १६ वर्षांची मुलगीही आहे. डीएनए चाचणीविषयी एक जाहिरात पाहिल्यानंतर आपली फॅमिली ट्री काय आहे हे समजून घेण्यासाठी माइयाने सहज डीएनए चाचणी केली. यामध्ये ती ज्या व्यक्तीला तिचे वडील समजत होती ते तिचे वडील नव्हतेच असे तिच्या लक्षात आले. यामुळे माइया आणि तिच्या कुटुंबियांना सुरूवातीला काहीसा धक्का बसला. मात्र त्यांनी या गोष्टीचा छडा लावायच ठरवला आणि आपले नेमके वडील कोण याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. 

भर लग्नात सर्वांदेखत तरुणानं नवरीला पळवलं, नवरदेव बसला गप्पा मारत- व्हायरल व्हिडिओ

माइया हिने घडलेली घटना आपली ६९ वर्षीय आई शेरिल, ६७ वर्षीय वडील जॉन, ३६ वर्षीय आणि २९ वर्षांची बहीण तहनी-ग्रेस यांना सांगितली, हे ऐकून बहिणींनाही आश्चर्य वाटले. तर आई-वडीलांनी अनेक वर्षांपासून आपल्या मुलींपासून लपवून ठेवलेले सत्य उघड करत खरी घटना मुलींना सांगितली. वडिलांना वयाच्या १८ व्या वर्षी टेस्टिक्युलर कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते, त्यामुळे ते वडील होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी हॉस्पिटलच्या मदतीने अज्ञात स्पर्म डोनरकडून पालक होण्याचा निर्णय घेतला. आपल्या पहिल्या दोन मुली या याच पद्धतीने जन्माला आल्याचे पालकांनी सांगितले. तर सगळ्यात धाकटी मुलगी ही केवळ नैसर्गिकरित्या जन्माला आलेले अपत्य असल्याचे त्यांनी उघड केले. 

माइया यांनी हा डोनर कोण होता याचा छडा लावण्यासाठी डीएनए अहवालाद्वारे ऑनलाइन फॅमिली ट्री बनवणाऱ्या साइट्सशी संपर्क साधला. त्यावेळी एकूण १८ महिला सापडल्या ज्या तिच्या सावत्र बहिणी होत्या. त्यानंतर नेमका प्रकार सर्वांच्याच लक्षात आला. तो म्हणजे अज्ञात दात्यांऐवजी उपचार करणाऱ्या डॉक्टरने स्वत:चे स्पर्म देऊन महिलांच्या कुटुंबाला पुढे नेण्याचे काम केले होते. मात्र माइया हिने सदर हॉस्पिटल आणि आता ८० वर्षे वय असलेल्या डॉक्टर जोन्स यांच्यावर कोर्टात दावा दाखल केला. मागील वर्षी एप्रिलमध्ये स्पर्म दानाबद्दल रुग्णाला माहिती न देता दान केल्याबद्दल कोर्टाने डॉ. जोन्स यांना दोषी ठरवले.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया